Ketan Agarwal Case Update: केतन अग्रवालसोबत शेवटी काय घडलं..? सियाने पोलिसांनी घटनास्थळ दाखवले, तिच्याच ताकदीचा अंदाज घेत..

या संपूर्ण हत्येचा पर्दाफाश करण्यासाठी फॉरेन्सिक टीमने एका विशेष वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला होता. केतनच्या हुबेहूब उंचीचा, वजनाचा आणि शरीरयष्टीचा एक पुतळा तयार करण्यात आला...

Ketan Agarwal Case Update: केतन अग्रवालसोबत शेवटी काय घडलं..? सियाने पोलिसांनी घटनास्थळ दाखवले, तिच्याच ताकदीचा अंदाज घेत..

Ketan Agarwal Murder Update : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल खून प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी सायन्स आणि फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर केला आहे. 18 जून रोजी केतनचा पाय घसरून मृत्यू झाला की त्याला ढकलण्यात आले, हे शोधण्यासाठी 28 जून रोजी लोहगडच्या 340 फूट खोल दरीपाशी एक थरारक डमी कसरत (ट्रायल) घेण्यात आली. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांनीच मिळून हा भयंकर कट रचल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण हत्येचा पर्दाफाश करण्यासाठी फॉरेन्सिक टीमने एका विशेष वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला होता. केतनच्या हुबेहूब उंचीचा, वजनाचा आणि शरीरयष्टीचा एक पुतळा तयार करण्यात आला आणि सियाच्या उपस्थितीतच तो दरीमध्ये ढकलून तपासण्यात आला. जर एखादी व्यक्ती पाय घसरून पडली तर तिचा मृतदेह कड्याच्या अगदी जवळ पडतो, तर धक्का दिल्यास तो वेगामुळे काही अंतरावर दूर जाऊन पडतो, हा विज्ञानाचा नियम वापरून पोलिसांनी सियाचा गुन्हा सिद्ध केला. स्वतः सियाने पोलिसांनी घटनास्थळ दाखवले आणि तिच्याच ताकदीचा अंदाज घेत हा प्रयोग करण्यात आला.

लग्नाचा कट आणि गुगल सर्चची मदत
साखरपुडा झाल्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी केतन आणि सियाचे लग्न होणार होते, मात्र सियाचे आधीपासूनच चेतनवर प्रेम होते. घरच्यांच्या भीतीने लग्न मोडणे शक्य नसल्याने सियाने पळून जाण्याऐवजी केतनलाच कायमचे रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिला चेतनसोबत लग्न करण्यासाठी 3 वर्षांचा वेळ मिळेल. यासाठी त्यांनी इंटरनेटची मदत घेतली होती. 31 मे रोजी जेव्हा केतन सियाला पहिल्यांदा लोहगडवर ट्रेकिंगसाठी घेऊन गेला, तेव्हाच तिने त्याला कड्यावरून ढकलण्याची पहिली पाहणी (रेकी) केली होती.

हेही वाचा – Ketan Murder Case: नको ती गरळ ओकला अन् सियाचा भाऊ पुरता फसला! साहिलच्या 'त्या' दाव्यामुळे प्रकरणाला नवीन फाटे फुटणार

सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी कपड्यांची चलाखी
गुन्हा करताना पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी चेतनने सीसीटीव्ही आणि कपडे बदलण्याची एक मोठी युक्ती केली होती. किल्ल्यावर चढताना चेतनने ओळख लपवण्यासाठी एक हुडी परिधान केली होती. मर्डर स्पॉटच्या काही वेळ आधी त्याने बॅगमधून दुसरा टी-शर्ट काढून घातला. केतनला दरीमध्ये ढकलल्यानंतर त्याने पुन्हा हुडी चढवली जेणेकरून प्रत्यक्षदर्शी पोलिसांना चुकीचे वर्णन सांगतील.

या डमी ट्रायल आणि तपासादरम्यान मीडियाला किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांची वाट पाहत थांबले होते. जेव्हा पोलीस आरोपी सियाला घेऊन खाली आले, तेव्हा पत्रकारांनी तिला हत्येच्या कारणाबाबत थेट प्रश्न विचारले, मात्र तिने मीडियासमोर पूर्णपणे मौन बाळगणे पसंत केले.

हेही वाचा – Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी पहिल्याच सुनावणीत धक्कादायक खुलासे समोर; आरोपीच्या वकिलांचे खळबळजनक दावे, तर केतनच्या वकिलांचा युक्तिवाद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number