Ketan Agarwal Murder Case Update: केतन अग्रवाल खून खटल्याला नवीन वळण; कटात तिसऱ्या व्यक्तीचा हात असल्याचा पोलिसांना संशय, तपासाचा वेग वाढला

पोलिसांनी त्या तिसऱ्या संशयित व्यक्तीचे नाव अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. केवळ दोघांनीच मिळून इतका मोठा कट रचला की त्यांना पडद्यामागून कोणी मदत केली, याचा तपास केला जात आहे.

Ketan Agarwal Murder Case Update: केतन अग्रवाल खून खटल्याला नवीन वळण; कटात तिसऱ्या व्यक्तीचा हात असल्याचा पोलिसांना संशय, तपासाचा वेग वाढला

Ketan Agarwal Murder Case Update : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या लोणावळा पोलिसांना आता या गुन्ह्यात आणखी एका गुप्त साथीदाराचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. मात्र, उरलेल्या 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत या दोघांची याच नवीन बाजूने कसून चौकशी केली जाणार आहे. या भयंकर हत्येच्या कटामागे असलेली आणि पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आलेली ती तिसरी गूढ व्यक्ती नेमकी कोण, या प्रश्नाने सध्या मावळ परिसरात खळबळ उडवून दिली आहे.

संपूर्ण गोयल कुटुंबियांची चौकशी आणि तांत्रिक तपास
गुन्ह्याचे मूळ शोधण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक संशयितांचे अधिकृत जबाब नोंदवले आहेत. या तपासादरम्यान पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित पुढील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे.
– सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा या संपूर्ण गोयल कुटुंबाची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.
– केतन आणि सियाचे लग्न जमवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मित्तल दाम्पत्याचे सलग 2 दिवस जबाब घेण्यात आले.
– या दोघांना प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाताना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाकडूनही संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Ketan Agrawal Case : केतनला धक्का दिला, त्याच्या फोनमधून पुरावे नष्ट केले, पण…; सियाने डिलिट केलेला महत्त्वाचा डेटा रिकव्हर? मोठे धागेदोरे हाती लागणार

पुरावे नष्ट केल्याच्या संशयावरून सियाच्या घरात पंचनामा
वडगाव न्यायालयातून आरोपींची रिमांड मिळवताना पोलिसांनी या कटात इतर लोकांचा सहभाग असण्याची शक्यता बोलून दाखवली होती. याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक कडक बंदोबस्तात आरोपी सिया गोयलला घेऊन थेट तिच्या पुण्यातील राहत्या घरी पोहोचले होते. 18 जून रोजी लोहगडावर ही घटना घडल्यानंतर सियाने घरात येऊन काही महत्त्वाचे पुरावे नष्ट केले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाई दरम्यान तिच्या उपस्थितीत घरातील वस्तूंचा पंचनामा करण्यात आला असून तिचे कपडे, मोबाईल आणि इतर संशयास्पद साहित्याची कसून तपासणी केली जात आहे.

जरी पोलिसांनी त्या तिसऱ्या संशयित व्यक्तीचे नाव अद्याप अधिकृतपणे जाहीर केले नसले, तरी या न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरोपींचे धाबे दणाणले आहेत. केवळ दोघांनीच मिळून इतका मोठा कट रचला की त्यांना पडद्यामागून कोणी आर्थिक किंवा मानसिक बळ पुरवले, या दिशेने आता शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व तांत्रिक दुवे जोडत असून लवकरच या हत्याकांडात नवीन अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Kirit Somaiya On Lonavala Crime : घाटकोपरच्या 16 वर्षीय तरुणीवर लोणावळ्याला नेऊन अत्याचार; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, "8 मुस्लिम 'गुंड'…"

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number