Walmik Karad Gang: कराड गँगची तुरुंगात गुंडगिरी; कैद्याला बेदम मारहाण, खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

तुरुंगातील बॅरॅकमध्ये बसण्याच्या किरकोळ जागेवरून या टोळीने एका कैद्याला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पीडित कैद्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.<br/>

Walmik Karad Gang: कराड गँगची तुरुंगात गुंडगिरी; कैद्याला बेदम मारहाण, खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

Walmik Karad Gang: सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात वाल्मिक कराड गँगने आता कारागृहाच्या भिंतींच्या आतही आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. तुरुंगातील बॅरॅकमध्ये बसण्याच्या किरकोळ जागेवरून या टोळीने एका कैद्याला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पीडित कैद्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

तुरुंगात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप या कराड गँगच्या सदस्यांचा अझर अब्दुल रहमान पठाण नावाच्या कैद्याशी बसण्याच्या जागेवरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि या गुंडांनी पठाणला बेदम चोप दिला. या मारहाणीत पठाणच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याने जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील खळबळजनक दावे 
व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पीडित कैदी अझर पठाण याने प्रशासकीय व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. 'जेल प्रशासनाने त्यांच्याकडून पैसे खाल्ले आहेत, त्यामुळे अधिकारी माझी तक्रार ऐकून घ्यायला तयार नाहीत. तुरुंग बदलण्याची धमकी दिली जात आहे. कुठेही तक्रार कर, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असे मला उघडपणे धमकावले जात आहे,' असं अझर अब्दुल रहमान पठाण याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याबाबतचे धक्कादायक विधान आणि वाल्मिक अण्णाकडे (कराड) बोलवण्याचे संदर्भ असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – Crime News: IRS अधिकाऱ्याच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं; घरातील 'त्या' व्यक्तीने काटा काढला?

तुरुंग प्रशासनाची भूमिका
या सर्व प्रकरणावर कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, मारहाण झाल्याच्या चर्चेनंतर संबंधित कैद्याची चौकशी करण्यात आली, मात्र त्याने अधिकृतपणे कोणतीही तक्रार दिलेली नाही. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाणीचे पुरावे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या क्लिपमुळे बीड पोलीस आणि कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number