AC ला गुडबाय, फक्त जवळ ठेवा ‘ही’ वस्तू ; वाढत्या उष्णतेवर ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितला आयुर्वेदिक उपाय

पुढे जात असताना आपण आपल्या आयुर्वेदातील जुन्या आणि पारंपरिक गोष्टी विसरू नयेत, असे आवाहनही सिंधिया यांनी यावेळी केले.

AC ला गुडबाय, फक्त जवळ ठेवा ‘ही’ वस्तू ; वाढत्या उष्णतेवर ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितला आयुर्वेदिक उपाय

Jyotiraditya Scindia Onion Advice as Heatwave Precautions : देशात उष्णतेची लाट तीव्र होत असताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी एक अनोखा आणि पारंपारिक सल्ला दिला आहे. शिवपुरी येथे रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, मे आणि जूनमधील 51 अंश सेल्सियस तापमानातही ते एअर कंडिशनिंग (AC) वापरत नाहीत. 'माझी त्वचा चंबळची आहे,' असे म्हणत त्यांनी आपल्या सहनशक्तीचे गुपित सांगितले. सिंधिया यांच्या मते, आधुनिक सोयीसुविधांपेक्षा जुन्या काळातील घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात.

जवळ कांदा ठेवण्याचा सल्ला
वाढत्या उष्मघातापासून वाचण्यासाठी सिंधिया यांनी लोकांना खिशात कांदा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, 'मी जरी दिसायला तरुण असलो तरी माझा आत्मा जुना आहे. खिशात कांदा ठेवा, तुम्हाला काहीही होणार नाही. आजच्या काळात लोक मोठे बॉक्सेस घेऊन फिरतात, पण मी स्वतः कांदा सोबत ठेवतो.' पुढे जात असताना आपण आपल्या आयुर्वेदातील जुन्या आणि पारंपरिक गोष्टी विसरू नयेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

IMD चा उष्णतेचा इशारा
दुसरीकडे, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला आहे. सध्या देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान 40 ते 46 अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. रविवारी अकोल्यात देशातील सर्वाधिक 46.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतासह दक्षिणेकडील राज्यांमध्येही सूर्याचा पारा वाढलेला असून नागरिकांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – Hottest City in India : सूर्य ओकतोय आग! विदर्भातील हे शहर ठरले देशात सर्वात उष्ण; पारा 47 अंशांवर

या राज्यांना बसणार फटका
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस खालील राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) कायम राहील –
उत्तर भारत: पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेचा अंदाज आहे.
मध्य भारत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 28 एप्रिलपर्यंत पारा चढाच राहणार आहे.
इतर भाग: बिहार, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागांत उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतील.
किनारी भाग: महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

पारंपरिक उपाय आणि आधुनिक वास्तव
सिंधिया यांचा हा सल्ला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विज्ञानाच्या युगातही आयुर्वेदातील काही जुन्या गोष्टी उष्मघातावर परिणामकारक ठरतात, असा त्यांचा दावा आहे. मात्र, हवामान विभागाने वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे, जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आणि उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे. 46.9 अंशांच्या पार गेलेला पारा पाहता, यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Maharashtra HeatWave : राज्यात उन्हाची काहिली वाढली! या जिल्ह्यातील तापमानाचा रेकॉर्डब्रेक आकडा; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number