RCB vs SRH IPL 2026: इशान किशन आणि अनिकेत वर्माची तुफान फटकेबाजी; RCB समोर 202 धावांचं लक्ष्य

इशानने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 38 चेंडूंमध्ये 80 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

RCB vs SRH IPL 2026: इशान किशन आणि अनिकेत वर्माची तुफान फटकेबाजी; RCB समोर 202 धावांचं लक्ष्य

RCB vs SRH IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामातील (IPL 2026) सलामीचा सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावा केल्या. आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी आता 202 धावांचे आव्हान पेलावे लागणार आहे.

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर इशान किशनचे वादळ
हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या 29 धावांवर त्यांचे अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी हे 3 प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर कर्णधार इशान किशन याने डावाची सूत्रे हाती घेतली. इशानने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 38 चेंडूंमध्ये 80 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. डावाच्या अखेरीस अनिकेत वर्माने केवळ 18 चेंडूंमध्ये 43 धावा कुटल्या, ज्यामुळे हैदराबादला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.

आरसीबीच्या गोलंदाजांचे जोरदार पुनरागमन
एकवेळ हैदराबाद मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना आरसीबीच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत सामन्यावर पकड मिळवली. जेकब डफी आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने आपल्या 4 षटकांत केवळ 22 धावा देऊन 3 बळी टिपले. हर्षल पटेलला जरी 'डक'वर बाद करण्यात यश आले असले, तरी पदार्पण करणाऱ्या अभिनंदन सिंगने इशान किशनचा महत्त्वाचा बळी मिळवला. फिल सॉल्टने टिपलेला चित्तथरारक झेल या डावाचे मुख्य आकर्षण ठरले. 17.5 षटकांत 174 धावसंख्या असताना हैदराबादने आपला 8 वा गडी गमावला होता.

हेही वाचा – RCB Tribute Stampede Victims: RCB चा हृदयस्पर्शी निर्णय; चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 11 जागा राखीव ठेवून वाहिली मृत चाहत्यांना श्रद्धांजली

नाणेफेक जिंकून रजत पाटीदारचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
या हंगामातील पहिल्याच सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाटीदारने सांगितले की, "हंगामाचा पहिला सामना असल्याने खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही प्रथम गोलंदाजी निवडली आहे. आम्ही केवळ विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी नाही, तर पुन्हा एकदा चषक जिंकण्यासाठी सज्ज आहोत." आरसीबीचे सर्व खेळाडू तंदुरुस्त असून संघात योग्य संतुलन असल्याचेही त्याने नमूद केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number