Atul Kulkarni on Ashok Kharat: ‘पकडले गेले तरच भोंदू का?’; अशोक खरात प्रकरणी अतुल कुलकर्णींचा परखड सवाल

खरात प्रकरणावर ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडले आहे.

Atul Kulkarni on Ashok Kharat: ‘पकडले गेले तरच भोंदू का?’; अशोक खरात प्रकरणी अतुल कुलकर्णींचा परखड सवाल

Atul Kulkarni on Ashok Kharat: नाशिक जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या तथाकथित ‘कॅप्टन’ अशोक खरातच्या विकृत कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. धार्मिक विधी आणि भीतीचा आधार घेत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाचे 58 अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. केवळ शोषणच नाही, तर भाविकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन खरातने सिन्नर, शिर्डी आणि ओझर परिसरात कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचेही तपासात उघड झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी (SIT) कडे असून, खरातचे मोठे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता आहे.

‘पकडले गेले तरच भोंदू का?’ – अतुल कुलकर्णींचे परखड सवाल
या प्रकरणावर ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडले आहे. खरातच्या अटकेनंतर संताप व्यक्त करताना त्यांनी अनेक बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत. “जेव्हा असे लोक पकडले जातात, तेव्हाच त्यांना ‘भोंदू’ का म्हटले जाते? त्याआधी ते कोण असतात? आणि जे कधीच पकडले जात नाहीत, त्यांचे काय?” असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Satara ZP Election Rada : सभागृहात सातारा झेडपी निवडणुकीतील राड्याचा मुद्दा तापला, जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप; शंभूराज देसाई आक्रमक

भक्तांच्या भूमिकेवरही उपस्थित केले प्रश्न
अतुल कुलकर्णी यांनी केवळ भोंदूबाबांवरच नाही, तर त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या भक्तांवरही टीका केली आहे. ते म्हणतात, “जेव्हा एखादा महाराज भोंदू निघतो, तेव्हा त्याचे भक्त नेमके कोण असतात? भागीदार, पीडित, अंधश्रद्धाळू की मूर्ख?” श्रद्धा कधी ‘अंध’ होते आणि त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारत त्यांनी हे सर्व नियम केवळ धर्मालाच नाही तर राजकारणालाही लागू होतात का, अशी विचारणा केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number