Drone Attack : इराणच्या आत्मघाती ड्रोनचा कुवेत विमानतळावर भीषण हल्ला! एका भारतीय प्रवाशाचा मृत्यू, 63 जण जखमी; थरारक व्हिडिओ व्हायरल

या स्फोटाच्या तीव्रतेमुळे विमानतळाच्या इमारतीचे छत कोसळले आणि काही मिनिटांतच संपूर्ण विमानतळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

Drone Attack : इराणच्या आत्मघाती ड्रोनचा कुवेत विमानतळावर भीषण हल्ला! एका भारतीय प्रवाशाचा मृत्यू, 63 जण जखमी; थरारक व्हिडिओ व्हायरल

Iranian Suicide Drone Attack Kuwait Airport : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या अत्यंत तीव्र युद्धसंघर्षाने आता संपूर्ण आखाती देशात (गल्फ कंट्रीज) एक भयानक रूप धारण केले आहे. दोन्ही देशांमध्ये कागदावर युद्धविराम (सीझफायर) लागू झालेला असतानाच, इराणने एक अत्यंत घातकी आणि विद्धंसक पाऊल उचलले. इराणच्या एका आत्मघाती ड्रोनने थेट कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल-1’ वर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये विमानतळ परिसरात उपस्थित असलेल्या 1 निष्पाप भारतीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर 63 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भयंकर हल्ल्याचे विमानतळावरील तब्बल 7 वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेले लाईव्ह फुटेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

7 कॅमेऱ्यांत कैद झाला थरारक विध्वंस; विमानतळाचे छत कोसळले
कुवेत सरकारच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) अधिकृतपणे विमानतळाच्या लाईव्ह सर्व्हिलन्स सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, 3 जून रोजी इराणचे एक आत्मघाती ड्रोन अत्यंत सुसाट वेगाने थेट विमानतळाच्या ‘टर्मिनल-1’ च्या इमारतीवर येऊन धडकते. ड्रोन आदळताच क्षणार्धात तिथे कानठळ्या बसवणारा प्रचंड मोठा स्फोट होतो आणि संपूर्ण परिसर आगीच्या गोळ्यात रुपांतरित होतो. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे विमानतळाच्या इमारतीचे छत कोसळले असून, प्रवासी आणि तिथला स्टाफ आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत. काही मिनिटांतच संपूर्ण विमानतळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे चित्र फुटेजमध्ये दिसत आहे.

भारतीय दूतावास ॲक्टिव्ह; जखमींवर उपचार आणि पार्थिव आणण्याचे प्रयत्न
परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अत्यंत वेदनादायी घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिला असून, मृत व्यक्ती ही भारतीय नागरिक होती आणि ती तिथून प्रवास करत होती असे स्पष्ट केले आहे.
दूतावासाची मदत: या हल्ल्यात अनेक भारतीय नागरिक जखमी देखील झाले आहेत. कुवेतमध्ये असलेले भारतीय दूतावास सध्या तेथील स्थानिक प्रशासन आणि रुग्णालयांच्या सतत संपर्कात आहे.
युद्धपातळीवर प्रयत्न: जखमी भारतीयांना तात्काळ सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि मृत पावललेल्या भारतीय नागरिकाचा पार्थिव देह लवकरात लवकर सन्मानाने भारतात आणता यावा, यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा – Claude AI ची सेवा जगभरात ठप्प! लाखो वापरकर्त्यांना फटका, कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू

‘निशाणा अमेरिकेचा तळ होता’; इराणचा अजब दावा
एवढा स्पष्ट आणि भयंकर व्हिडिओ समोर आल्यानंतरही इराण आपल्या अरेरावीच्या भूमिकेवर ठाम आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत कुवेत आणि अमेरिकेचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. इराणने म्हटले आहे की, ‘आमचा निशाणा कुवेतचे नागरी विमानतळ नव्हताच. आम्ही फक्त कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळाला टार्गेट केले होते. तिथे तैनात असलेली अमेरिकेची ‘पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम’ पूर्णपणे निकामी ठरली. अमेरिकेची ही सिस्टीम आमच्या ड्रोनला हवेत रोखू शकली नाही आणि त्यांचे स्वतःचेच क्षेपणास्त्र नियंत्रणाबाहेर जाऊन विमानतळाच्या छतावर कोसळले.’

अमेरिकेकडून इराणचा दावा फेटाळला; युद्धाचा भडका उडण्याची भीती
इराणचा हा विचित्र दावा अमेरिकन लष्कर आणि कुवेत प्रशासनाने पूर्णपणे खोटा आणि हास्यास्पद असल्याचे म्हणत फेटाळून लावला आहे. कुवेतच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या कृत्याला अत्यंत अमानुष आणि गुन्हेगारी वृत्तीचे लक्षण म्हटले आहे. दुसरीकडे, इराणच्या दाव्यानुसार अमेरिकेने काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका कमर्शियल ऑइल टँकरवर आणि बेटावरील कम्युनिकेशन केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आपण कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे स्पष्टीकरण इराणने दिले आहे. या ताज्या हल्ल्यामुळे आखाती देशांमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.

हेही वाचा – स्पेनला जाणाऱ्या युनायटेड एअरलाईन्सच्या विमानात ब्लूटूथ नेटवर्कवर संशयास्पद नाव दिसल्यानंतर खळबळ उडाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number