Industrial Water Tariff Hike: औद्योगिक पाणीपट्टीत तिपटीने वाढ! पुणे-सांगलीतील उद्योजकांमध्ये संताप

एमआयडीसीने 9 सप्टेंबर रोजी पाणीपट्टीत मोठी वाढ जाहीर केली. यानुसार, प्रति घनमीटर (1 हजार लिटर) पाण्याचे दर 1 रुपयांपासून थेट 28.75 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. <br/>

Industrial Water Tariff Hike: औद्योगिक पाणीपट्टीत तिपटीने वाढ! पुणे-सांगलीतील उद्योजकांमध्ये संताप

Industrial Water Tariff Hike: उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते. उद्योगधंद्यांची ही गरज भागवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) पाणीपुरवठा करते. मात्र, एमआयडीसीच्या अलीकडील निर्णयामुळे पुणे आणि सांगलीतील उद्योजकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसीने 9 सप्टेंबर रोजी पाणीपट्टीत मोठी वाढ जाहीर केली. यानुसार, प्रति घनमीटर (1 हजार लिटर) पाण्याचे दर 1 रुपयांपासून थेट 28.75 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. 

यामध्ये औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरील औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति घनमीटर 2.75 रुपये, पाणी कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 28 रुपये, तर औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरील घरगुती ग्राहकांसाठी प्रति घनमीटर 1 रुपया वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा – Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा तडाखा! 24 तासांत 8 जणांचा मृत्यू, शेकडो जनावरे दगावली

1 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर –  

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 2013 नंतर प्रथमच पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टीचे दर वाढविणे आणि विजेच्या खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नवे दर 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

हेही वाचा – CM Devendra Fadnavis : राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत; इतक्या दिवसांत पैसे खात्यात जमा होणार

दरम्यान, या दरवाढीला उद्योग संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. उद्योगांना विश्वासात न घेता पाणीपट्टीत तीन ते चार पटींनी वाढ करण्यात आली आहे, हा निर्णय अवास्तव असून त्याचा उद्योगांवर प्रतिकूल परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number