ICC Ranking: ICC रँकिंगमध्ये भारतीय महिला संघाचा दबदबा; स्मृती मानधना पुन्हा बनली जगातील नंबर 1 फलंदाज

टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

ICC Ranking: ICC रँकिंगमध्ये भारतीय महिला संघाचा दबदबा; स्मृती मानधना पुन्हा बनली जगातील नंबर 1 फलंदाज

ICC Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली असून भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचा मोठा फायदा स्मृतीला मिळाला असून, तिने जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

लॉरा वोल्वार्डला मागे सारत मानधना अव्वल स्थानी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर जाहीर झालेल्या या रँकिंगमध्ये स्मृती मानधना 790 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत स्मृतीने 58 आणि 31 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या. तथापि, मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत वोल्वार्डला पुन्हा आपले अव्वल स्थान मिळवण्याची संधी असेल.

हरमनप्रीत कौरची टॉप 10 मध्ये एन्ट्री
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमवावी लागली असली, तरी कर्णधार हरमनप्रीत कौरने वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत प्रगती केली आहे. मालिकेत 53, 54 आणि 25 धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीतने थेट 4 स्थानांची झेप घेत नववे (9) स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि एलिसा हीली यांनीही प्रत्येकी दोन स्थानांची प्रगती केली असून त्या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, एलिसा हीली भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार आहे.

हेही वाचा – Sanju Samson: इंग्लंडविरुद्धच्या महामुकाबल्यातून संजू सॅमसन बाहेर? 'या' एका चुकीमुळे ICC करू शकते कारवाई

अष्टपैलू क्रमवारीत दीप्ती शर्माची घसरण
एकदिवसीय अष्टपैलू (All-rounders) खेळाडूंच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश गार्डनरने 516 रेटिंग पॉइंट्ससह आपले पहिले स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज 418 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला या क्रमवारीत फटका बसला असून ती एका स्थानाने घसरून पाचव्या (5) क्रमांकावर आली आहे. ऑस्ट्रेलियाची अ‍ॅनाबेल सदरलँड आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number