Travel Photographer of the Year : जागतिक व्यासपीठावर ‘वारी’चा डंका! भारतीय छायाचित्रकार गोपाळकृष्ण बडे यांना ‘ट्रॅव्हल फोटोग्राफर 2025’ पुरस्कार

प्रतिष्ठित 'ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर (TPOTY) 2025' पुरस्कारांची घोषणा झाली असून, ग्रामीण महाराष्ट्रातील एका बोलक्या छायाचित्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.

Travel Photographer of the Year : जागतिक व्यासपीठावर ‘वारी’चा डंका! भारतीय छायाचित्रकार गोपाळकृष्ण बडे यांना ‘ट्रॅव्हल फोटोग्राफर 2025’ पुरस्कार

Travel Photographer of the Year : जागतिक प्रवास-छायाचित्रण (Travel Photography) क्षेत्रात भारताने आणि विशेषतः महाराष्ट्राने एका ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. प्रतिष्ठित ‘ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर (TPOTY) 2025’ पुरस्कारांची घोषणा झाली असून, ग्रामीण महाराष्ट्रातील एका बोलक्या छायाचित्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. महाराष्ट्रातील दशावतार गोपाळकृष्ण बडे यांनी ‘संस्कृती, वारसा आणि श्रद्धा’ (Culture, Heritage & Belief) श्रेणीमध्ये मानाचा ‘सिंगल इमेज’ पुरस्कार पटकावला आहे.

वारीचे विलोभनीय चित्रण: मातीशी जोडलेली भक्ती
बाडे यांना पंढरपूर वारी यात्रेचे अत्यंत प्रभावी चित्रण केल्याबद्दल हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या पुरस्कार विजेत्या छायाचित्रात वारीदरम्यानच्या सामूहिक उत्सवाचा एक जिवंत क्षण टिपण्यात आला आहे. कमी कोनातून (Low Angle) काढलेल्या या फोटोमध्ये विस्तीर्ण आकाशाच्या पार्श्वभूमीवर दोन वारकरी पारंपरिक काठी-नृत्य करताना दिसत आहेत, तर इतर भाविक टाळ्या वाजवून त्यांना साथ देत आहेत. “त्यांचे कपडे चिखलाने माखलेले आहेत, जे या प्रवासाच्या मातीशी जोडलेल्या भक्तीमय भावनेचे प्रतीक आहे. हे चित्र भक्ती, ऊर्जा आणि सांस्कृतिक समृद्धीचे मिश्रण आहे,” असे वर्णन बडे यांनी आपल्या कलाकृतीबद्दल केले आहे.

हेही वाचा – Pinky Mali: शेवटचा फोन आणि ‘तो’ निरोप… अजित पवारांच्या विमानातील फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं

22 वर्षांची परंपरा आणि एआय (AI) ला मनाई
TPOTY स्पर्धा ही जगातील सर्वात प्रतिष्ठित छायाचित्रण स्पर्धांपैकी एक मानली जाते. यंदाच्या 22 व्या वर्षात 157 देशांमधून 20,000 हून अधिक जणांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे, या स्पर्धेत जनरेटिव्ह एआय (Generative AI) वापरण्यास सक्त मनाई होती. परीक्षकांनी अत्यंत कठोर नियमांनुसार आणि निनावी पद्धतीने (Anonymous Judging) सर्वोत्कृष्ट छायाचित्रांची निवड केली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या बडे यांच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या ‘वारी’ परंपरेची दखल आता जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. इन्स्टाग्रामवरून आपला आनंद व्यक्त करताना त्यांनी हा सन्मान आपल्या सर्व मित्र आणि समर्थकांना समर्पित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number