दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यानंतर मायदेशी परतलेल्या शार्दूल ठाकूरचा लोकलने प्रवास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई टीम इंडियाच्या खेळाडूने चक्क मुंबई लोकलने प्रवास केल्याच दृश्य समोर आलयं. पालघरच्या शार्दूल ठाकूरने अंधेरी ते पालघर असा प्रवास लोकल रेल्वेने केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यानंतर टीम इंडियासह शार्दूल भारतात परतला. त्यानंतर त्याने अंधेरी वरून पालघरसाठी लोकल रेल्वे पकडली आणि रेल्वेने प्रवास केला. शार्दूलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या […]

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यानंतर मायदेशी परतलेल्या शार्दूल ठाकूरचा लोकलने प्रवास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टीम इंडियाच्या खेळाडूने चक्क मुंबई लोकलने प्रवास केल्याच दृश्य समोर आलयं. पालघरच्या शार्दूल ठाकूरने अंधेरी ते पालघर असा प्रवास लोकल रेल्वेने केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यानंतर टीम इंडियासह शार्दूल भारतात परतला. त्यानंतर त्याने अंधेरी वरून पालघरसाठी लोकल रेल्वे पकडली आणि रेल्वेने प्रवास केला.

शार्दूलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. क्रिकेटमुळे सर्वांच्या समोर आलेल्या अनेक खेळाडूंना आकाश ठेंगणं झाल्याचं आपण पाहिलं आहे. शार्दूलने त्याच्या अथक मेहनतीच्या जोरावर टीम इंडियात स्थान मिळवलं होत. टीम इंडियात पदार्पण करण्याआधीही शार्दूलने कित्येकदा मुंबईत लोकलने प्रवास केला होता.

त्यामुळे आफ्रिकेवरुन परतल्यानंतर कदाचीत त्याच्या मनात पुन्हा एकदा लोकलने प्रवास करण्याची इच्छा निर्मण झाली असावी व त्याने प्रवासही केला. त्याच्या य़ा प्रवासा दरम्यान बाकी प्रवासीही त्याच्याकडे उत्सुकतेने पाहात होते, आणि हा नक्की शार्दूल ठाकूरच आहे की नाही याची खात्री करुन घेत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number