India Vs Pakistan Asia Cup 2025 Final: ‘धो डाला’!; भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 146 धावात गुंडाळलं, अंतिम सामन्याचा climax बाकी

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ 19.1 षटकात 146 धावांवर बाद झाला.

India Vs Pakistan Asia Cup 2025 Final: ‘धो डाला’!; भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 146 धावात गुंडाळलं, अंतिम सामन्याचा climax बाकी

India Vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ 19.1 षटकात 146 धावांवर बाद झाला. कुलदीप यादवने चार विकेट घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजांना गोंधळात टाकले, तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बुमराहने हरिस रौफला क्लिन बोल्ड करून संघाला महत्त्वाचा झटका दिला. रौफ फक्त सहा धावांत बाद झाला.

वरुण, अक्षर आणि कुलदीपच्या गोलंदाजी त्रिकुटाने पाकिस्तानला सलग आठ विकेट गमावण्यास भाग पाडले. फखर जमानने अर्धशतक हुकले. पण तो 35 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. मोहम्मद हॅरिस आणि सॅम अयुबसारख्या फलंदाजांनाही पुन्हा गोलंदाजांनी शुन्यावर बाद केले.

हेही वाचा – IND vs PAK Asia Cup Final: नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय! हार्दिक पंड्याऐवजी रिंकू सिंगला संधी

पहिली सलामी भागीदारी होती खास

पहिल्या विकेटसाठी साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी 84 धावांची भागीदारी केली. फरहान 38 चेंडूत 57 धावा करून झेलबाद झाला. ही भागीदारी अंतिम सामन्यातील उच्चतम सलामी भागीदारी ठरली.

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलपूर्वी नवा वाद! PCB ने आता अर्शदीप सिंगविरुद्ध दाखल केली तक्रार

भारतासमोर विजयासाठी लक्ष्य

पाकिस्तान पूर्ण 20 षटके खेळू शकला नाही. भारतासमोर आता 147 धावांचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठणे भारतीय संघासाठी महत्वाचे ठरणार आहे. ही सामन्यातील फिरकीपटूंची जबरदस्त कामगिरी आणि विकेट्सवरील नियंत्रण भारताच्या विजयाच्या दिशेने मोठे पाऊल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number