भारताला राहुल गांधींची गरज नाही – अनुराग कश्यप

सध्या संपूर्ण देशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात तीव्र आंदोलने आणि निदर्शने चालू आहेत. या पाश्वभुमीवर अनेक नेतेमंडळी या प्रकरणाविषयी आपले मत मांडत आहेत. तसेच काही बॉलीवूड कलाकारही या प्रकरणावर मते मांडत आहेत. आता या कलाकरामध्ये अनुराग कश्यपचे नाव जोडले गेले आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा प्रकरणावर अनुरागने एका टिव्टला रिटिव्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. यामुळे […]

भारताला राहुल गांधींची गरज नाही – अनुराग कश्यप

सध्या संपूर्ण देशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात तीव्र आंदोलने आणि निदर्शने चालू आहेत. या पाश्वभुमीवर अनेक नेतेमंडळी या प्रकरणाविषयी आपले मत मांडत आहेत. तसेच काही बॉलीवूड कलाकारही या प्रकरणावर मते मांडत आहेत.

आता या कलाकरामध्ये अनुराग कश्यपचे नाव जोडले गेले आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा प्रकरणावर अनुरागने एका टिव्टला रिटिव्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.

काय म्हणाला अनुराग कश्यप ?

शिवम विज नावाच्या एक व्टिटर युजरने त्याच्या अकाउंटवरून दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारणे हे एक नाटकच आहे. अनेक लोकांनी जमावबंदीचा विरोध केला आहे. रविवारी राहुल गांधी यांच्याकडून कामाची अपेक्षा आपण कशी काय करू शकतो ? असे व्टिट केले होते.

या व्टिटला अनुराग कश्यपने रिव्टिट करत भावा हे काय राहुल गांधींना जमणार नाही. त्यांना म्हणावं तुम्ही सिओलमध्येच राहा, तेच तुमच्यासाठी योग्य आहे. अगदीच झाले तर टोक्योला जा. इकडे त्यांची गरज नाही. अशा शब्दात कश्यपने आपली प्रतिक्रिया मांडली .

अनुरागचे हे व्टिट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number