India-Nepal Border : भारत-नेपाळ सीमेवर नवा पेच! भारतीय वाहनांसाठी नेपाळचे नियम कडक; प्रवेश परवाना आणि वेळेचे बंधन

नेपाळ सरकारने भारत-नेपाळ सीमा ओलांडणाऱ्या भारतीय वाहनांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे. यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

India-Nepal Border : भारत-नेपाळ सीमेवर नवा पेच! भारतीय वाहनांसाठी नेपाळचे नियम कडक; प्रवेश परवाना आणि वेळेचे बंधन

India Nepal Border Vehicle Entry Rules : नेपाळ सरकारने भारत-नेपाळ सीमा ओलांडणाऱ्या भारतीय वाहनांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू केली असून, यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः भारतीय नोंदणी क्रमांक असलेल्या दुचाकींना आता नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी 'प्रवेश परवाना' आणि निश्चित कालावधीचा 'पास' घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नेपाळमधील बालेंद्र सरकार सध्या या नियमांची कठोर अंमलबजावणी करत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भारतीय वाहनांवर जप्तीसारखी कठोर कारवाई केली जाणार आहे.

प्रवेश पास आणि सीमा शुल्काचा जाच
मालंगवा येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सीडीओ रामू राज कादरिया आणि स्थानिक महापौरांनी या नवीन सुरक्षा धोरणावर शिक्कामोर्तब केले आहे. नवीन नियमानुसार:
– भारतीय दुचाकीस्वारांना सीमेवरच एक पास दिला जाईल, ज्यावर परतण्याच्या वेळेचा स्पष्ट उल्लेख असेल.
– या पासच्या आधारावर केवळ जिल्हा मुख्यालय परिसरापर्यंतच फिरण्याची मुभा असेल.
– जर वाहनचालकाला मुख्यालयापेक्षा पुढे नेपाळमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्याला 'सीमा शुल्क' (Customs Duty) भरणे अनिवार्य असेल.
– पूर्वी हे नियम केवळ कागदोपत्री होते. मात्र आता त्याची अंमलबजावणी प्रत्येक वाहनासाठी सक्तीची करण्यात आली आहे.

तस्करी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पाऊल
नेपाळ प्रशासनाने या निर्णयाचे समर्थन करताना तस्करी आणि अवैध कारवायांचा दाखला दिला आहे. अनेकदा भारतीय हद्दीतून चोरलेली वाहने सहजपणे नेपाळमध्ये आणली जातात किंवा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरली जातात. याशिवाय, नेपाळमधील महागडी वाहने टाळण्यासाठी अनेक स्थानिक नागरिक भारतीय नातेवाईकांच्या नावावर वाहने घेऊन ती नेपाळमध्ये उघडपणे चालवतात. या प्रकारांमुळे नेपाळच्या महसुलाचे नुकसान होत असून गुन्हेगारीलाही खतपाणी मिळत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या निर्णयामुळे नेपाळी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी सीमावर्ती भारतीयांची अडचण वाढली आहे.

हेही वाचा – Gold Price Increased: युद्धविरामानंतर सोन्याच्या किमतीत मोठी उलथापालथ; जागतिक सराफा बाजारात सोन्याचे दर तब्बल…

भारतीयांची नाराजी आणि प्रतिसादाची मागणी
नेपाळच्या या 'एकतर्फी' निर्णयामुळे भारतीय नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारतीयांचे म्हणणे आहे की, एकीकडे भारतीय वाहनांवर कडक निर्बंध लादले जात असताना दुसरीकडे नेपाळी वाहने भारतात कोणत्याही अडथळ्याविना मुक्तपणे फिरत आहेत. भारतानेही 'जशास तसे' धोरण स्वीकारून नेपाळी वाहनांच्या प्रवेशासाठी अशाच प्रकारचे परवाने किंवा प्रवेश शुल्क लागू करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. सीमावर्ती भागातील रोटी-बेटीच्या व्यवहारांवर आणि दैनंदिन व्यापारावर या नवीन नियमांचा मोठा परिणाम होणार असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

सुरक्षा तपासणी आणि कडक अंमलबजावणी
आता भारतीय वाहने नेपाळमध्ये प्रवेश करताच त्यांची कसून तपासणी केली जाईल. प्रभावशाली व्यक्ती किंवा समाजकंटक पूर्वी या नियमांकडे दुर्लक्ष करत असत, मात्र आता बालेंद्र सरकारच्या आदेशानुसार कोणालाही सवलत दिली जाणार नाही. सीमा ओलांडताना मिळणाऱ्या पासवरील वेळेचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाईल. या निर्णयामुळे सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची आणि प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Crude Oil Price Crash: युद्ध थांबताच क्रूड ऑईलच्या किमती कोसळल्या; कच्च्या तेलाच्या किमतीत 15 डॉलरची मोठी घसरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number