India Gold Purchase : आयात शुल्कात वाढ आणि मोदींचे आवाहन; तरीही भारतीयांचे सोन्यावरील प्रेम उफाळले, खरेदीचा नवा विक्रम!

देशांतर्गत बाजारातील सोन्याची मागणी आणि आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ केली. तरीही भारतीयांचे सोन्याबाबतचे आकर्षण कमी झालेले नाही.

India Gold Purchase : आयात शुल्कात वाढ आणि मोदींचे आवाहन; तरीही भारतीयांचे सोन्यावरील प्रेम उफाळले, खरेदीचा नवा विक्रम!

India Gold Purchase Trends 2026 : भारतीयांचे सोन्याशी असलेले नाते केवळ आर्थिक नसून अत्यंत भावनिक आहे. संकटकाळात हक्काचा पैसा मिळवून देणारा धातू म्हणून या मौल्यवान संपत्तीकडे पाहिले जाते. परंतु, याच अतिखरेदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय चलन साठ्यावर (फॉरेक्स रिझर्व्ह) प्रचंड ताण पडत आहे. हाच वाढता दबाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे थेट आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाचा बाजारावर कोणताही फरक पडलेला नाही. लग्नसराईचा हंगाम आणि सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून सराफा बाजारात ग्राहकांची पावले अविरतपणे वळत आहेत.

देशांतर्गत बाजारातील सोन्याची मागणी आणि आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 13 मे 2026 रोजी सोन्यावरील आयात शुल्कात (इम्पोर्ट ड्युटी) मोठी वाढ केली. सरकारने बेसिक कस्टम ड्युटी 5 टक्क्यांनी वाढवून 10 टक्के केली, तसेच कृषी आणि पायाभूत सुविधा विकास उपकर (सेस) 1 टक्क्यावरून 5 टक्के केला. यामुळे एकूण आयात शुल्क आता 15 टक्क्यांवर पोहोचले आहे. या निर्णयामुळे देशात सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला असून, पूर्वी 10 ग्रॅमसाठी 1,47,160 रुपयांना मिळणारे २४ कॅरेट सोने आता 10 टक्क्यांनी महागून तब्बल 1,62,120 रुपयांवर पोहोचले आहे.

वाढत्या किमतींनंतरही डिजिटल आणि फिजिकल खरेदी जोरात
– फिजिकल गोल्ड: वाढलेल्या किमती थेट दागिन्यांच्या दरात जोडल्या गेल्या असल्या तरी लग्नसराईच्या मौसमामुळे दागिन्यांच्या दुकानांमधील गर्दी ओसरलेली नाही.
– गोल्ड ईटीएफ (ETFs): म्युच्युअल फंडांच्या गोल्ड ईटीएफमधील दरांचे बदल हळूहळू लागू होत असल्याने हुशार गुंतवणूकदारांनी या पर्यायात मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला आहे.
– डिजिटल गोल्ड: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि रिफायनर्सच्या माध्यमातून ग्राहकांनी अल्पमुदतीसाठी डिजिटल गोल्ड युनिट्सची रेकॉर्डतोड खरेदी केली आहे.

हेही वाचा – Travel Expense: पंतप्रधान मोदींच्या आवाहनापूर्वीच भारतीयांचा परदेश प्रवासाचा उत्साह मंदावला; RBI कडून धक्कादायक आकडेवारी समोर

भारत आपल्या एकूण गरजेपैकी तब्बल 90 टक्के सोने परदेशातून आयात करतो. देशात दरवर्षी 700 ते 800 टन सोन्याची आयात केली जाते. कच्च्या तेलानंतर आयात होणारी ही देशातील दुसरी सर्वात मोठी वस्तू असून, आर्थिक वर्ष 2025−26 मध्ये सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर 72 अब्ज डॉलरचा प्रचंड भार पडला आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि वाढते शुल्क यामुळे बाजारात जरी अनिश्चितता असली, तरी ग्राहक आता वजनदार दागिन्यांऐवजी बजेट सांभाळण्यासाठी 'लाइट वेट' (कमी वजनाचे) दागिने खरेदी करण्याकडे वळले आहेत. जुने सोने बदलून नवीन दागिने घेण्याचा ट्रेंडही वाढला असून, यासाठी ओरिजिनल बिल आणि सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे, अन्यथा मेकिंग चार्जेसमध्ये मोठे नुकसान होऊ शकते.

डायमंड ऑफरचा सुवर्णयोग आणि सोन्यावरील कराचे नियम
सध्याच्या लग्नसराईत अनेक ज्वेलर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डायमंड ज्वेलरीवर मोठी सूट आणि 'झिरो मेकिंग चार्ज' सारख्या ऑफर्स देत आहेत. शुद्ध सोन्याचे दर रोजच्या बाजारावर ठरतात आणि देशातील 280 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ते सहज बदलून मिळतात, मात्र डायमंडचे बायबॅक नियम आणि त्याचे मूल्यांकन पूर्णपणे वेगळे असल्याने ग्राहकांनी खरेदी करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

याशिवाय, सोन्याच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यावरील कराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोने खरेदी केल्यापासून 1 वर्षाच्या आत विकल्यास तो नफा तुमच्या उत्पन्नात जोडला जाऊन टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो. तर फायनान्स कायदा 2024 नुसार, 2 वर्षांनंतर फिजिकल गोल्ड विकल्यास 12.5 टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. हा कर वाचवण्यासाठी तज्ज्ञ कलम 54F नुसार तो पैसा निवासी मालमत्तेत (रेसिडेन्शियल प्रॉपर्टी) गुंतवण्याचा सल्ला देतात.

हेही वाचा – LPG-PNG New Rules: PNG जोडणी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत करावं लागणार 'हे' काम; नवीन नियम लागू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number