पंतप्रधान शाहबाज यांच्यानंतर आता इम्रान खानचे खाते भारतात ब्लॉक

पाकिस्तानच्या पंतप्रधानानंतर आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अकाउंट भारतात सस्पेंड करण्यात आले आहे.

पंतप्रधान शाहबाज यांच्यानंतर आता इम्रान खानचे खाते भारतात ब्लॉक
Edited Image

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताकडून जलद कारवाई सुरू आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानानंतर आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अकाउंट भारतात सस्पेंड करण्यात आले आहे. यापूर्वी सरकारने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या 4 मंत्र्यांचे एक्स अकाउंट निलंबित केले होते. यानंतर, पंतप्रधानांचे यूट्यूब अकाउंट देखील बंद करण्यात आले. याआधीही भारताने पाकिस्तानी क्रिकेटपटू, मीडिया संस्था आणि मोठ्या पत्रकारांचे यूट्यूब आणि सोशल मीडिया अकाउंट निलंबित केले होते.

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे यूट्यूब आणि सोशल मीडिया हँडल सतत भारताविरुद्ध विष ओकत आहेत. अशा परिस्थितीत, भारत सरकार त्यांच्यावर सतत कारवाई करत आहे. यापूर्वी सरकारने पंतप्रधान शाहबाज शरीफ, मंत्री इशाक दार, ख्वाजा आसिफ यांच्यासह 4 मंत्र्यांची खाती निलंबित केली होती. यामध्ये रेल्वे आणि माहिती मंत्र्यांचाही समावेश होता. यापूर्वी, सरकारने डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, जिओ न्यूज, सुनो न्यूज सारख्या काही वृत्तसंस्थांचे यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते.

हेही वाचा – '...मी सुइसाईड बॉम्बर म्हणून पाकिस्तानात जाईन,' कर्नाटकातील मंत्री जमीर खान यांचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर आयटी मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. ही सर्व सोशल मीडिया अकाउंट्स भारताच्या सुरक्षा संस्था आणि सैन्याविरुद्ध दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती पसरवत होती. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचा कणा सर्व प्रकारे मोडण्याचा प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने आज भारताने पाकिस्तानसोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापारावर बंदी घातली आहे.

हेही वाचा – भारताचा आणखी एक 'स्ट्राइक'! पाकिस्तानी जहाजांना भारतात नो एन्ट्री

आजपासून दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारची आयात-निर्यात होणार नाही. याशिवाय, भारतीय ध्वज असणारी जहाजे आता कोणत्याही पाकिस्तानी बंदरात जाणार नाहीत. त्याच वेळी, पाकिस्तानी ध्वज असणारी जहाजे भारतीय बंदरांवर येणार नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number