Padmapani Award 2026 : भारतीय संगीतसृष्टीचे ‘ऋषी’ इलयाराजा यांना मानाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात होणार गौरव

इलयाराजा यांनी गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ भारतीय संगीतावर आपली मोहिनी घातली आहे. आतापर्यंत त्यांनी 7,000 हून अधिक गाणी आणि 1,500 पेक्षा जास्त चित्रपटांना संगीत दिले आहे.

Padmapani Award 2026 : भारतीय संगीतसृष्टीचे ‘ऋषी’ इलयाराजा यांना मानाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात होणार गौरव

Padmapani Award 2026 : भारतीय चित्रपट संगीताला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा यांना यंदाचा प्रतिष्ठित 'पद्मपाणि पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित 11 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (AIFF 2026) त्यांना हा सन्मान प्रदान केला जाईल. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत निवड समितीने ही घोषणा केली असून, या समितीमध्ये आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता.

28 जानेवारीला दिमाखदार सोहळा; रोख 2 लाख आणि सन्मानचिन्ह
हा गौरव सोहळा बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात पार पडणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 2 लक्ष रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. महोत्सवाचे संस्थापक नंदकिशोर कागलीवाल आणि प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पुढील पाच दिवस म्हणजेच 1 फेब्रुवारीपर्यंत प्रोझोन मॉल येथील आयनॉक्समध्ये देश-विदेशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

हेही वाचा – A R Rahman : 'विकी कौशलचा 'छावा' समाजात फूट पाडणारा चित्रपट; ए. आर. रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य

5 दशकांचा प्रवास आणि 7,000 गाण्यांचा विक्रम
इलयाराजा यांनी गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ भारतीय संगीतावर आपली मोहिनी घातली आहे. आतापर्यंत त्यांनी 7,000 हून अधिक गाणी आणि 1,500 पेक्षा जास्त चित्रपटांना संगीत दिले आहे. तामिळ, तेलगू, हिंदी आणि चक्क मराठी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी आपल्या सुरांनी अढळ स्थान निर्माण केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्त्य सिम्फनीचा सुरेख संगम ही त्यांची प्रमुख ओळख असून, त्यांना प्रेमाने 'इसैग्नानी' (संगीतातील ऋषी) असे संबोधले जाते.

मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आता जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचा उत्सव ठरला आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाचे सहकार्य लाभलेल्या या महोत्सवामुळे मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात मोठे होत आहे. यावर्षी इलयाराजांसारख्या दिग्गज कलाकाराचा सन्मान या मातीत होत असल्यामुळे कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पाच दिवसांच्या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ सहभागी होणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

हेही वाचा – Dhanush Marriage : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'नॅशनल क्रश' धनुष मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधणार? कोण आहे ती?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number