ICC Action on Babar Azam: बाबर आझमला मोठा धक्का! टी20 तिरंगी मालिकेपूर्वी ICC ने सुनावली कठोर शिक्षा

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार प्रदर्शन करूनही त्याला आयसीसीकडून कठोर कारवाईचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच पाकिस्तानने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला.

ICC Action on Babar Azam: बाबर आझमला मोठा धक्का! टी20 तिरंगी मालिकेपूर्वी ICC ने सुनावली कठोर शिक्षा

ICC Action on Babar Azam: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम टी20 तिरंगी मालिकेच्या अगोदरच अडचणीत सापडला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार प्रदर्शन करूनही त्याला आयसीसीकडून कठोर कारवाईचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच पाकिस्तानने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला. या मालिकेत बाबरने दुसऱ्या सामन्यात नाबाद 102 धावा ठोकत शानदार शतकाची नोंद केली होती. मात्र, निर्णायक तिसऱ्या सामन्यात त्याची खेळी फक्त 34 धावांपर्यंतच मर्यादित राहिली. बाद झाल्यानंतर त्याची निराशा मात्र महागात पडली.

बाबर आझमवर सामन्याच्या फीच्या 10 टक्के दंड

तिसऱ्या वनडे सामन्यात बाद झाल्यानंतर बाबरने चिडून बॅटने थेट स्टंपवर प्रहार केला. ही कृती आयसीसीच्या आचारसंहितेतील लेव्हल-1 च्या उल्लंघनात मोडत असल्यामुळे त्याच्यावर शिक्षेची कारवाई करण्यात आली. बाबर आझमला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याला त्याच्या सामन्याच्या फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.  

हेही वाचा – Ind vs Sa 1st Test : "कसोटी क्रिकेटला भावपूर्ण श्रद्धांजली…" वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड

चूक मान्य केल्याने सुनावणी टळली

बाबरने घटनात्मक चूक मान्य केली असून दंड स्वीकारला आहे. त्यामुळे त्याच्या प्रकरणावर स्वतंत्र सुनावणीची आवश्यकता उरली नाही. लेव्हल-1 गुन्ह्यात साधारणपणे फटकार ते 50 दंड आणि एक ते दोन डिमेरिट पॉइंट्स अशी कारवाई केली जाते.

हेही वाची – Team India Controversy: गिल आणि गंभीर यांच्यातील वाद विकोपाला? दुखापतीनंतर टीममध्ये अंतर्गत कलह; दुसरी कसोटी संकटात

टी20 मालिकेची तयारी

वनडे मालिकेत 165 धावा करणारा बाबर आता झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी20 तिरंगी मालिकेत मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून टी20 मध्ये त्याने पुनरागमन केले असून, त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number