Tukaram Mundhe: ‘250 कोटींच्या सुपारी’च्या आरोपावर आयुक्त तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; थेट शब्दांत दिले उत्तर!

ड्रग्ज लॉबीच्या 250 कोटी रुपयांच्या सुपारीबाबत प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Tukaram Mundhe: ‘250 कोटींच्या सुपारी’च्या आरोपावर आयुक्त तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; थेट शब्दांत दिले उत्तर!

Tukaram Mundhe Press Conference Reaction : या कोट्यवधी रुपयांच्या कथित ‘सुपारी’ आणि बदलीच्या गंभीर आरोपांवर अखेर खुद्द तुकाराम मुंढे यांनी जाहीरपणे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या आर्थिक जुळवाजुळवीबाबत आणि स्वतःच्या बदलीच्या चर्चांविषयी आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती किंवा कल्पना नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. ‘ज्यांनी हा दावा केला आहे, त्यांनाच तुम्ही याबद्दल अधिक विचारले पाहिजे; मला यावर कोणतीही टिप्पणी करायची नाही,’ असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. यासोबतच, राज्यात चुकीचे काम करणाऱ्यांवर ‘माफिया’ म्हणूनच कारवाई केली जाईल आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उद्योजकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी या वेळी दिली.

हेही वाचा – Devendra Fadnvis : ‘कुणाचंही घर आम्ही बॉम्बने उडवू देणार नाही; पोकळ धमक्यांना कुणी घाबरू नये’; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आणि मोठ्या लॉबीकडून तब्बल 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला होता. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेकायदेशीर व्यवसाय आणि औषध माफियांच्या विरोधात सुरू केलेल्या कडक कारवाईच्या धड्यामुळे अस्वस्थ झालेल्या रॅकेटने हा कट रचल्याचे आव्हाडांनी म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणाची नावे पुढील आठवड्यात सोमवारी आपण सभागृहात जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number