IAS Tukaram Munde: तुकाराम मुंढेंचा FDA कर्मचाऱ्यांना रोखठोक इशारा; ‘शासकीय नियमांनुसार काम जमणार नसेल तर…’

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या 29 कर्मचाऱ्यांनी 15 जुलै रोजी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तुकाराम मुंढेंविरुद्ध अधिकृत तक्रार केली होती.

IAS Tukaram Munde: तुकाराम मुंढेंचा FDA कर्मचाऱ्यांना रोखठोक इशारा; ‘शासकीय नियमांनुसार काम जमणार नसेल तर…’

IAS Tukaram Munde's Warning to Staff: अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. आपल्या शिस्तबद्ध आणि कडक कामकाजाच्या पद्धतीविरोधात खात्याच्या मंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंढेंनी अत्यंत रोखठोक शब्दांत उत्तर दिले आहे. 'ज्यांना शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल, त्यांनी थेट राजीनामा देऊन निघून जावे (They are free to resign and go),' असा थेट इशारा दिल्यामुळे एफडीएमधील अंतर्गत तणाव अधिकच वाढला आहे.

छत्रपती संभाजीनगर प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे धाव
छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या 29 कर्मचाऱ्यांनी 15 जुलै रोजी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तुकाराम मुंढेंविरुद्ध अधिकृत तक्रार सादर केली होती. या निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम लावणे, शनिवार, रविवार तसेच इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी काम करण्याचे आदेश देणे आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढल्याचा आरोप करण्यात आला होता. इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशी एकच शिफ्ट ठेवण्याची मागणी या तक्रारदार कर्मचाऱ्यांनी केली होती.

'लॅब ही 24 तास चालणारी संस्था; 10 ते 6 ची वेळ येथे लागू होणार नाही'
कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केली. ते म्हणाले, 'प्रयोगशाळा (Lab) हे इतर सामान्य सरकारी कार्यालयासारखे नाही, तर ती 24 तास सुरू असणारी अत्यावश्यक सेवा आहे. कर्मचाऱ्यांना 24 तास काम करायचे नसून आठवड्यातून 48 तास म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) नियमानुसार दररोज 8 तासांचीच शिफ्ट दिली जात आहे. सर्वांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी दिली जात आहे. त्यामुळे 10 ते 6 ची वेळ मागणे पूर्णपणे चुकीचे असून ती मागणी पूर्ण केली जाऊ शकत नाही.'

हेही वाचा – Shiv Sena : निवडणूक आयोगाला अधिकार कोणी दिला? ठाकरेंच्या वकीलाचा निवडणूक आयोगाला थेट तो प्रश्न; शिंदेंच्या अडचणीत वाढ

भविष्यात प्रयोगशाळा 24 तास सुरू ठेवण्याचा मुंढेंचा प्लॅन
सध्या प्रयोगशाळेचे काम दोन शिफ्टमध्ये 6 दिवस सुरू असले, तरी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करण्यासाठी गरज पडल्यास येत्या काळात हे काम 24 तास सुरू केले जाईल, असा स्पष्ट संकेतही मुंढेंनी दिला. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या प्रयोगशाळा 24 तास कार्यरत असतात, याचे स्मरण त्यांनी कर्मचाऱ्यांना करून दिले. कर्मचाऱ्यांचा काही गैरसमज झाला असल्यास तो लवकरच दूर केला जाईल, मात्र कामाच्या दर्जाशी आणि शिस्तीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, यावर त्यांनी भर दिला.

मुंढेंच्या निर्णयावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून समर्थनाचा सूर
दरम्यान, एफडीएमधील या वादंगानंतर सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ आणि विरोधात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक वर्षांपासून काही शासकीय विभागांत अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार काम करत असून हीच चुकीची सवय मोडून काढण्यासाठी मुंढे प्रयत्न करत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. तुकाराम मुंढेंनी प्रशासनात शिस्त आणण्यास प्राधान्य दिल्यानेच कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा सध्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा – Abhijeet Dipke CJP : आता पुढे काय? CJP चं नवीन मिशन ठरलं! आता 'या' पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करणार; दीपकेंनी सर्वचं सांगितलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number