Masood Azhar Claim: ‘मी मस्क-झुकरबर्गपेक्षाही श्रीमंत…’; मसूद अझहरचा दावा

या रेकॉर्डिंगमध्ये अझहर म्हणतो की, “जिहादासाठी जे काही मागितलं ते मला मिळालं. शस्त्रे खरेदी करायची असो किंवा मोहिमा उभारायच्या असोत, आमच्याकडे पैशांची कधीच कमतरता नसते.”

Masood Azhar Claim: ‘मी मस्क-झुकरबर्गपेक्षाही श्रीमंत…’; मसूद अझहरचा दावा

Masood Azhar Claim: दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हायरल झालेल्या धक्कादायक ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये अझहरने स्वतःची तुलना जगातील श्रीमंत उद्योजकांशी केली असून धक्कादायक दावा केला आहे. त्याने एलोन मस्क आणि फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गपेक्षाही तो अधिक श्रीमंत असल्याचा दावा केला आहे.

जिहादसाठी पैसा कधीच कमी पडत नाही – मसूद अझहर

या रेकॉर्डिंगमध्ये अझहर म्हणतो की, “जिहादासाठी जे काही मागितलं ते मला मिळालं. शस्त्रे खरेदी करायची असो किंवा मोहिमा उभारायच्या असोत, आमच्याकडे पैशांची कधीच कमतरता नसते.” दहशतवादी कारवायांसाठी निधी कसा मिळतो याबाबत मात्र त्याने काहीही स्पष्ट केलेले नाही.

दिल्लीतील स्फोट  

दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्याशीही जैशचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर मोहम्मद आणि मुझम्मिल शकील हे दोघेही दिल्ली स्फोटाच्या काही आठवडे आधी तुर्कीला गेले होते. तिथे त्यांनी जैशच्या एका शीर्ष हँडलरशी गुप्त बैठक घेतल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या दोघांना अफगाणिस्तानातील जैश कमांडरकडून सूचनाही मिळत होत्या.

हेही वाचा – Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात; मक्का ते मदीना जाणारी बस टँकरवर आदळली, 42 भारतीयांचा मृत्यू

जैशचा दुसरा ऑडिओही चर्चेत  

यापूर्वीही जैशचा वरिष्ठ दहशतवादी आणि IC814 अपहरणाचा सूत्रधार मुफ़्ती अब्दुल रौफ असगर याचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो म्हणतो, “जीवन जिहादमध्येच आहे. सन्मान मिळणार असेल तर तो जिहादामधूनच.” रौफ असगर हा मसूद अझहरचा सख्खा भाऊ आहे.

हेही वाचा – Sheikh Hasina Verdict : शेख हसीना दोषी, विशेष न्यायालयाने सुनावली मृत्युदंडाची शिक्षा

जैशची ‘महिला ब्रिगेड’ तयार करण्याची हालचाल

दुसरीकडे, जैशची ताकद वाढवण्यासाठी आता महिलांना रणांगणात उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मसूद अझहरची बहीण सईदा अझहर ही महिला ब्रिगेड उभारण्याचे नेतृत्व करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना महिला विंग तयार करण्याची तयारी करत आहे. यासाठी, ते 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कराची येथे एक विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे. या शिबिरात गरीब आणि तरुणींना कट्टरपंथी विचारसरणीने वेढण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number