ITR Filing : इन्कम टॅक्स रिटर्न भरताना योग्य फॉर्म निवडणं आवश्यक; ITR-1, ITR-2 आणि ITR-3 मधील फरक समजून घ्या

टॅक्स भरताना केवळ वेळेत आयटीआर दाखल करणे पुरेसे नसते, तर आपल्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार योग्य फॉर्म निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. जाणून घ्या, अधिक माहिती..

ITR Filing : इन्कम टॅक्स रिटर्न भरताना योग्य फॉर्म निवडणं आवश्यक; ITR-1, ITR-2 आणि ITR-3 मधील फरक समजून घ्या

How to Choose Correct ITR Form 2026? : देशभरात सध्या आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return – ITR) दाखल करण्याचा सीझन अधिकृतपणे सुरू झाला आहे. टॅक्स भरताना केवळ वेळेत आयटीआर दाखल करणे पुरेसे नसते, तर आपल्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार योग्य फॉर्म निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. इन्कम टॅक्स विभागाकडून नोकरदार वर्ग, पेन्शनधारक, व्यावसायिक आणि फ्रीलान्सर यांच्यासाठी वेगवेगळे आयटीआर फॉर्म जारी केले जातात. चुकीचा फॉर्म निवडल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा थेट आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी ITR−1, ITR−2 आणि ITR−3 या फॉर्मपैकी तुमच्यासाठी कोणता योग्य आहे, हे सविस्तर जाणून घ्या.

आयटीआर-1 (ITR-1) कोणासाठी? 50 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 'सहज' पर्याय
आयटीआर-1 फॉर्म हा 'सहज फॉर्म' म्हणूनही ओळखला जातो. हा फॉर्म देशातील सर्वाधिक करदात्यांकडून वापरला जातो. खालील निकषांमध्ये बसणाऱ्या व्यक्तींनी हा फॉर्म भरणे गरजेचे आहे:
– वार्षिक मर्यादा: ज्या करदात्यांची एकूण वार्षिक कमाई 50 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांच्यासाठीच हा फॉर्म मर्यादित आहे.
– उत्पन्नाचा स्रोत: पगारदार कर्मचारी (Salaried Class), पेन्शनधारक तसेच एका घरापासून भाड्याचे उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती हा फॉर्म भरू शकतात.
– इतर स्रोत: बँक बचत खात्यावरील (Saving Account) व्याज, फिक्स डिपॉझिटवर (FD) मिळणारे व्याज किंवा कौटुंबिक पेन्शन यांसारख्या इतर मार्गांनी उत्पन्न असणारे नागरिक ITR−1 दाखल करू शकतात.

आयटीआर-2 (ITR-2) कधी भरावा? 50 लाखांपेक्षा जास्त कमाई आणि एकापेक्षा जास्त घर असल्यास नियम बदला
जर तुमचे उत्पन्न वर नमूद केलेल्या अटींपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ITR−2 फॉर्म निवडावा लागतो. पगार, पेन्शन किंवा इतर स्रोतांसोबतच ज्या हिंदू अविभक्त कुटुंबांची (HUF) आणि व्यक्तींची एकूण वार्षिक कमाई 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना हा फॉर्म भरावा लागतो. याशिवाय, ज्यांच्या नावावर एकापेक्षा जास्त निवासी घरे आहेत, ज्यांना शेअर्स किंवा प्रॉपर्टी विक्रीतून 'कॅपिटल गेन्स' (Capital Gains) मिळाला आहे, किंवा ज्यांची परदेशी संपत्ती आणि परदेशातून उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी ITR−2 बंधनकारक आहे. मात्र, लक्षात ठेवा की व्यवसायातून किंवा कोणत्याही स्वतंत्र पेशातून (Business or Profession) नफा मिळवणारे लोक हा फॉर्म भरू शकत नाहीत.

हेही वाचा – Excise Duty Waiver Ethanol Petrol: इंधनाच्या वाढत्या दरांवर केंद्र सरकारचा उपाय; 'या' श्रेणीतील पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ

आयटीआर-3 (ITR-3) कोणासाठी आवश्यक? व्यावसायिक आणि शेअर गुंतवणूकदारांसाठी खास फॉर्म
व्यावसायिक, उद्योगपती आणि सल्लागार किंवा फ्रीलांसर म्हणून काम करणाऱ्यांसाठी ITR−3 हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीला किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाला (HUF) स्वतःच्या व्यवसायातून किंवा स्वतंत्र पेशातून उत्पन्न मिळत असेल, तर त्यांना ITR−3 दाखल करावा लागतो. याव्यतिरिक्त, एखाद्या भागीदारी संस्थेतील (Partnership Firm) भागीदारांना त्या संस्थेकडून पगार, कमिशन, व्याज किंवा बोनस स्वरूपात उत्पन्न मिळत असल्यास हाच फॉर्म वापरावा लागतो. तसेच, ज्या गुंतवणूकदारांनी संबंधित आर्थिक वर्षात 'अनलिस्टेड इक्विटी शेअर्स'मध्ये (सूचीबद्ध नसलेल्या समभागांमध्ये) पैसे गुंतवले आहेत, त्यांच्यासाठीही आयकर विभागाने ITR−3 फॉर्म भरणे अनिवार्य केले आहे.

लक्षात ठेवा 'ही' महत्त्वाची तारीख; 31 जुलैपूर्वी टॅक्स फायलिंग पूर्ण करा
सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी (Individual Taxpayers) म्हणजेच ज्यांना ITR−1 आणि ITR−2 अंतर्गत आपला आयकर परतावा दाखल करायचा आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने अंतिम मुदत निश्चित केली आहे. या सर्व सामान्य करदात्यांसाठी आयटीआर दाखल करण्याची अखेरची तारीख 31 जुलै आहे. ऐन वेळेस होणारी घाई, तांत्रिक अडचणी आणि लेट फी (Late Fee) म्हणून बसणारा आर्थिक दंड टाळण्यासाठी करदात्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपले सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करून तातडीने टॅक्स फायलिंग पूर्ण करावे, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा – Petrol-Diesel Price: इराण-अमेरिका तणावाचा मोठा परिणाम; कच्च्या तेलाने घेतली झेप, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी अपडेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number