YouTube व्हिडिओजमधून होणाऱ्या कमाईचे गणित समजून घ्या; किती व्ह्यूज मिळाल्यानंतर किती पैसे मिळतात?

अनेक नवीन क्रिएटरना प्रश्न पडतो की, जर त्यांच्या एखाद्या व्हिडिओला 10,000 व्ह्यूज मिळाले, तर त्यांना किती पैसे मिळतील? हे गणित कशावर अवलंबून आहे, ते समजून घेऊ..

YouTube व्हिडिओजमधून होणाऱ्या कमाईचे गणित समजून घ्या; किती व्ह्यूज मिळाल्यानंतर किती पैसे मिळतात?

YouTube Videos Earning: आजच्या काळात यूट्यूबवर व्हिडिओ बनवणे हा केवळ छंद किंवा टाईमपास राहिला नसून तो एक उत्तम उत्पन्नाचा मार्ग बनला आहे. अनेक नवीन क्रिएटरना प्रश्न पडतो की, जर त्यांच्या एखाद्या व्हिडिओला 10,000 व्ह्यूज मिळाले, तर त्यांना किती पैसे मिळतील? यूट्यूबच्या कमाईचे गणित हे केवळ व्ह्यूजवर नसून ते जाहिरातींची गुणवत्ता, विषयाची निवड आणि प्रेक्षकांचे ठिकाण यावर अवलंबून असते. हीच बाब जाणून घेणे क्रिएटर्ससाठी आवश्यक आहे.

10,000 व्ह्यूजवर मिळणारा संभाव्य मोबदला
यूट्यूबवर मिळणारे पैसे हे व्हिडिओच्या श्रेणीनुसार बदलतात. 2026 मधील ताज्या ट्रेंडनुसार, भारतात साधारणपणे 1,000 व्ह्यूजमागे 50 रुपये ते 200 रुपयेपर्यंत कमाई होऊ शकते. या हिशोबाने 10,000 व्ह्यूजसाठी मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे असू शकते. मात्र, ही कमाई होण्यासाठी तुमचे चॅनल 'यूट्यूब पार्टनर प्रोग्राम' (YouTube Partner Program) अंतर्गत मॉनिटाइज असणे अनिवार्य आहे.
– नवीन किंवा लहान चॅनल: 20,000 व्ह्यूजसाठी साधारणपणे 500 रुपये ते 2,000 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.
– प्रस्थापित मोठे चॅनल: जर चॅनल खूप लोकप्रिय असेल, तर हा आकडा अधिक असू शकतो. 10 लाख व्ह्यूजवर 50,000 रुपये ते 2,00,000 रुपये आणि 1 कोटी व्ह्यूजवर तब्बल 20,00,000 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

यूट्यूबच्या कमाईचे मुख्य आधार: CPM आणि RPM
क्रिएटरला मिळणारा पैसा हा प्रामुख्याने दोन तांत्रिक बाबींवर ठरतो:
CPM (Cost Per Mille): जाहिरातदार 1,000 जाहिराती दाखवण्यासाठी यूट्यूबला जे पैसे देतात, त्याला CPM म्हणतात. भारतात हे प्रमाण साधारण Rs 20 ते Rs 150 च्या दरम्यान असते.
RPM (Revenue Per Mille): यूट्यूब आपला वाटा कापून घेऊन प्रत्यक्ष क्रिएटरला 1,000 व्ह्यूजमागे जो पैसा देते, त्याला RPM म्हणतात. यात केवळ जाहिरातीच नाही, तर सुपरचॅट, मेंबरशिप आणि यूट्यूब प्रीमियमच्या उत्पन्नाचाही वाटा असतो.

हेही वाचा – Mobile Battery Blast : फोनची बॅटरी अचानक फुटली अन् मुलाचा अंगठा झाला निकामी; मुलांना फोन देताना तुम्हीही 'ही' चूक करतायं का?

उत्पन्नावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक
प्रत्येक क्रिएटरची कमाई सारखी नसते, कारण ती खालील घटकांवर अवलंबून असते:
व्हिडिओचा विषय (Niche): फायनान्स, बिझनेस किंवा टेक विषयांवरील व्हिडिओंना अधिक पैसे मिळतात. कॉमेडी किंवा व्लॉग्ससाठी तुलनेत कमी मोबदला मिळतो.
प्रेक्षकांचा देश: जर तुमचा व्हिडिओ अमेरिका किंवा युरोपमध्ये पाहिला जात असेल, तर भारतीय प्रेक्षकांच्या तुलनेत 10 पट अधिक कमाई होऊ शकते.
व्हिडिओचा कालावधी: लांब व्हिडिओंवर अधिक जाहिराती लावता येतात, ज्यामुळे उत्पन्न वाढते.

यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी अटी
कमाई सुरू करण्यासाठी क्रिएटरला काही निकष पूर्ण करावे लागतात. चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी गेल्या 12 महिन्यांत किमान 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 तासांचा वॉच टाइम पूर्ण असणे आवश्यक आहे. दर्जेदार आशय आणि नियमितता हेच यूट्यूबवर यशस्वी होण्याचे मुख्य सूत्र आहे.

हेही वाचा – Starlink Direct to Cell Service : आता मोबाईल रेंजसाठी टॉवर्सची गरजच नाही! 'स्टारलिंक' भारतात सुरू करणार 'डायरेक्ट-टू-सेल' सेवा; उपग्रहाद्वारे मिळणार हाय-स्पीड नेटवर्क

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number