IMD Weather Forecast : पावसाचा अचूक अंदाज हवामान खातं कसं वर्तवतं? जाणून घ्या हवामानशास्त्राचं रहस्य

तुम्हाला अनेकदा असा प्रश्न पडला असेल की, पाऊस कधी पडणार, वादळ कधी धडकणार किंवा चक्रीवादळ कोणत्या दिशेने सरकणार याचा अचूक अंदाज हवामानशास्त्रज्ञ आधीच कसा लावतात?

IMD Weather Forecast : पावसाचा अचूक अंदाज हवामान खातं कसं वर्तवतं? जाणून घ्या हवामानशास्त्राचं रहस्य

यंदा अल निनोमुळे प्रशांत महासागरातील तापमानात बदल होत आहेत आणि थेट परिणाम भारतातील पावसावरही होतोय. पण तुम्हाला अनेकदा असा प्रश्न पडला असेल की, पाऊस कधी पडणार, वादळ कधी धडकणार किंवा चक्रीवादळ कोणत्या दिशेने सरकणार याचा अचूक अंदाज हवामानशास्त्रज्ञ आधीच कसा लावतात? यामागे कोणतीही जादू नसून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय विश्लेषण आहे. 

हवामान खात्याचं अंदाज वर्तवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन डॉप्लर वेदर रडार आहे. हे रडार साधारणपणे 150 ते 200 किलोमीटर परिसरातील ढगांची हालचाल, पावसाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग यावर सातत्याने लक्ष ठेवत वातावरणात विद्युतचुंबकीय लहरी पाठवल्या जातात. त्यानुसार, पावसाचा जोर किती आहे आणि पुढील काही तासांत हवामानात कोणते बदल होऊ शकतात, याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञ बांधतात.

हेही वाचा- Eye Health Tips: पावसाळ्यात वाढतो 'ड्राय आय'चा धोका! कारण जाणून घ्या आणि डोळ्यांची अशी घ्या काळजी

त्यानंतर दुसरं आहे सॅटेलाईट, दर 15 मिनिटांनी सॅटलाईट ढगांचे स्वरूप, आर्द्रता, समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आणि दाबाचा अंदाज अशा प्रकारची हवामानाची माहिती पुरवतात. या माहितीनुसार, हवामानशास्त्रज्ञ चक्रीवादळ, मान्सूनचा प्रवास आणि इतर गोष्टींचा अंदाज लावतात. हवामानशास्त्रज्ञ दर दोन दिवसांनी वेदर बलून सोडतात, ज्यामुळे हवेचं स्वरूप आणि वातावरणीय स्थितीचा अंदाज घेणं सोपं होतं. 

हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी केवळ आकाशातील ढगांचा अभ्यास पुरेसा नसतो, तर समुद्रातील घडामोडींचाही बारकाईने अभ्यास केला जातो. कारण मान्सून, चक्रीवादळे आणि अनेक हवामान बदलांची सुरुवात समुद्रातूनच होते. त्यामुळे हवामानखाते समुद्रात बसवलेल्या तरंगत्या उपकरणांचा आणि विविध सेन्सर्सचा वापर करतो. त्यातून हवामानाचा अंदाज वर्तवला जातो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number