Uttar Pradesh Accident : टूरिस्ट बसचा भीषण अपघात; बस उलटून महाराष्ट्रातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू; तर 35 प्रवासी जखमी

वाराणसी-गोरखपूर महामार्गावर भाविकांची एक पर्यटक बस अनियंत्रित होऊन उलटल्याने महाराष्ट्रातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Uttar Pradesh Accident : टूरिस्ट बसचा भीषण अपघात; बस उलटून महाराष्ट्रातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू; तर 35 प्रवासी जखमी

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात गुरुवारी एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. वाराणसी-गोरखपूर महामार्गावर भाविकांची एक पर्यटक बस अनियंत्रित होऊन उलटल्याने महाराष्ट्रातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ किंकाळ्यांचा आवाज आणि घबराटीचे वातावरण पसरले होते.

महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची ओळख पटली असून, त्या महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. यामध्ये पुणे येथील रहिवासी अन्नपूर्णा देवी (50) आणि बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी सरस्वती देवी (70) यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या 35 प्रवाशांपैकी 3 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बुलढाणा आणि जळगाव परिसरातील सुमारे 95 ते 96 भाविकांचा गट तीर्थयात्रेसाठी निघाला होता. चित्रकूट आणि वाराणसीचे दर्शन घेऊन हा गट दोन बसमधून नेपाळमधील काठमांडूच्या दिशेने रवाना झाला होता. गुरुवारी सकाळी नैसरे गावाजवळ समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले. बस वेगाने दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच उलटली.

मदत आणि बचाव कार्य
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. एएसपी (शहर) डॉ. राकेश कुमार मिश्रा यांनी पोलीस ताफ्यासह रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सर्वजण वाराणसीहून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार होते, मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

हेही वाचा – Baramati Bypoll : काँग्रेसची अनपेक्षित माघार, करुणा शर्मांचा लढण्याचा निर्धार; धनंजय मुंडेंवर डागली टीकेची तोफ

भाविकांचा नेपाळ प्रवास ठरला शेवटचा
हा प्रवास जळगाव आणि बुलढाणा भागातील भाविकांसाठी अत्यंत दुःखद ठरला. वाराणसी येथून दोन बसमध्ये विभागून हे प्रवासी प्रवास करत होते. एका बसमधील प्रवाशांना या अपघाताचा फटका बसला. सध्या सर्व जखमींवर स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number