Steel Plant Accident: स्टील प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; वितळलेले लोखंड अंगावर सांडलं, 8 कामगारांचा होरपळून मृत्यू

प्लांटमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक प्रचंड तापमानाचे वितळलेले लोखंड (Liquid Steel) कामगारांच्या अंगावर सांडले.

Steel Plant Accident: स्टील प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; वितळलेले लोखंड अंगावर सांडलं, 8 कामगारांचा होरपळून मृत्यू

Steel Plant Accident: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि वेदनादायी बातमी समोर आली आहे. सोमवार रोजी ‘राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड’ (RINL) च्या पोलाद कारखान्यामध्ये कामादरम्यान एक भीषण अपघात झाला. प्लांटमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक प्रचंड तापमानाचे वितळलेले लोखंड (Liquid Steel) कामगारांच्या अंगावर सांडले. या अत्यंत दुर्दैवी आणि मोठ्या अपघातात किमान 8 कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि कामगार वर्गात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Attack on Ship in Hourmuz: होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव शिगेला! जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, नौदलाकडे मागितली मदत, धक्कादायक व्हिडीओ समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
विशाखापट्टणम पोलाद कारखान्यातील या भीषण दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ दखल घेतली आहे. सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील या अपघाताची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. ज्या कुटुंबांनी आपले हक्काचे लोक या दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच या अपघातातील जखमी कामगार लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो.” स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा बाधितांना जागेवरच सर्व आवश्यक ती मदत पुरवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक साहाय्य जाहीर
या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून (PMNRF) या अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक मृत कामगाराच्या नातेवाईकांना 2,00,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. यासोबतच, या भीषण दुर्घटनेत गंभीररीत्या होरपळलेल्या आणि जखमी झालेल्या इतर कामगारांना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number