मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर झालेल्या अपघातानंतर आता व्हीआयपींसाठी नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला.   राज्य सरकार तब्बल 90 कोटी रुपयांचं नवं हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. हेलिकॉप्टर खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार असून, निविदा प्रक्रिया वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.   सध्या राज्य सरकारच्या सेवेत एक […]

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर झालेल्या अपघातानंतर आता व्हीआयपींसाठी नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला.

 

राज्य सरकार तब्बल 90 कोटी रुपयांचं नवं हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. हेलिकॉप्टर खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार असून, निविदा प्रक्रिया वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

सध्या राज्य सरकारच्या सेवेत एक विमान असून, ते सुस्थितीत आहे. या विमानासाठी एक वैमानिक आणि सहवैमानिकाची नियुक्ती लवकरच करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

तसंच सरकारच्या मालकीचे निलंगामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर, तसंच बंद पडून असलेले अन्य एक हेलिकॉप्टर आणि एक विमान यांची विक्री केली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number