Meghalaya Coal Mine Blast : हृदयद्रावक! मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट; 16 मजुरांचा दुर्दैवी अंत

या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 16 मजुरांचा मृत्यू झाला असून, अनेक मजूर अद्यापही खाणीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Meghalaya Coal Mine Blast : हृदयद्रावक! मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट; 16 मजुरांचा दुर्दैवी अंत

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका कोळसा खाणीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 16 मजुरांचा मृत्यू झाला असून, अनेक मजूर अद्यापही खाणीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. थांगस्कू परिसरात ही दुर्घटना घडली असून, ही खाण बेकायदेशीरपणे चालवली जात असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शोध आणि बचाव कार्य युद्धपातळीवर
पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) मदत मागवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासन अडकलेल्या इतर मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – Helicopter Crash: मोठी बातमी! हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, ही खाण ‘रॅट-होल’ पद्धतीने चालवली जात होती. या पद्धतीमध्ये कोळसा काढण्यासाठी केवळ 3 ते 4 फूट उंचीचे अरुंद बोगदे खणले जातात, ज्यात एकावेळी फक्त एकच व्यक्ती मावू शकते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (NGT) 2014 मध्येच अशा असुरक्षित आणि अशास्त्रीय खाणकाम पद्धतीवर बंदी घातली होती. मात्र, बंदी असूनही छुप्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या या खाणी मजुरांच्या जीवावर बेतल्या आहेत.

एनजीटीची बंदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि मजुरांच्या सुरक्षिततेचा धोका लक्षात घेऊन एनजीटीने यापूर्वीच मेघालयातील रॅट-होलच्या खाणकामावर कडक निर्बंध लादले होते. सर्वोच्च न्यायालयानेही ही बंदी कायम ठेवत केवळ वैज्ञानिक आणि नियंत्रित पद्धतीनेच खाणकाम करण्यास परवानगी दिली होती. मात्र, थांगस्कू येथील ही खाण सर्व नियम धाब्यावर बसवून चालवली जात असल्याचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number