Monalisa Bhosale: ‘तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा…’; व्हायरल गर्ल मोनालिसाचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप

कोची येथे पती फरमान खानसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिने आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Monalisa Bhosale: ‘तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा…’; व्हायरल गर्ल मोनालिसाचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Monalisa Bhosale: महाकुंभ मेळ्यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली आणि ‘निळ्या डोळ्यांची परी’ म्हणून ओळखली जाणारी मोनालिसा भोसले हिने आता खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ज्या दिग्दर्शकाने तिला चित्रपटात पहिली संधी दिली आणि ज्याला ती ‘वडिलांसमान’ मानत होती, त्याच मनोज मिश्रा यांनी आपला शारीरिक छळ केल्याचा आरोप मोनालिसाने केला आहे. कोची येथे पती फरमान खानसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिने आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही दिवसांपूर्वीच पळून जाऊन लग्न केल्यानंतर मोनालिसाच्या या भूमिकेमुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

चित्रीकरणादरम्यान अयोग्य स्पर्श  
मोनालिसाच्या दाव्यानुसार, ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नेपाळ आणि डेहराडून येथे मनोज मिश्रा यांनी तिच्याशी गैरवर्तन केले. “तो मला अनेकदा मिठी मारून माझ्या शरीराला सर्वत्र स्पर्श करायचा,” असा आरोप तिने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तिने याबद्दल आपल्या कुटुंबाला दोनदा कळवले होते. मात्र कुटुंबाने तिला पाठिंबा देण्याऐवजी चित्रपटाच्या भविष्याचा आणि पैशांचा विचार करून गप्प बसण्यास सांगितले. मनोज मिश्राने आपल्या कुटुंबाला चित्रपटाचे बजेट 10 कोटी असल्याचे सांगून फसवले, प्रत्यक्षात मात्र त्यात 3 लाख रुपयेही गुंतवले नव्हते, असेही तिने नमूद केले.

हेही वाचा – Harry Potter Web Series : हॅरी पॉटरची जादू आता वेब सीरिजमध्ये! हॉगवर्ट्सच्या जगात पुन्हा एन्ट्री; पहिला लूक पाहिलात का?

दरम्यान, 11 मार्च रोजी तिरुवनंतपुरम येथे फरमान खान याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केल्यानंतर, मनोज मिश्रा आपल्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मोनालिसाने केला आहे. “मनोज मिश्राला या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप देऊन देशात दंगली घडवायच्या आहेत,” असे ती म्हणाली. तिचा पती फरमान याला विनाकारण ‘दहशतवादी’ ठरवले जात असून, त्यांना तुकडे-तुकडे करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. स्वतःचे पोस्टर्स जाळले जात असल्याचे सांगत तिने सरकारकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

पोलिसांत तक्रार न करण्यामागचे कारण
“मी पोलिसांत जाण्याच्या बेतात होते, पण माझ्या कुटुंबानेच मला रोखले,” असे सांगताना मोनालिसाला रडू कोसळले. मनोज मिश्रा हा तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांचे शोषण करणारा ‘नीच’ माणूस असल्याचे तिने म्हटले आहे. दुसरीकडे, तिचे वडील विजय सिंग भोसले यांनी या लग्नाला विरोध केला होता, मात्र मोनालिसा ही 18 वर्षांची सज्ञान असल्याने तिला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या हे दाम्पत्य प्रचंड दहशतीखाली असून त्यांनी तातडीने मदतीचे आवाहन केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number