Fake Electricity Bill Scam: ‘आज रात्री तुमची वीज कापली जाईल?’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? थांबा! आधी हे वाचा, नाहीतर रिकामं होईल बँक खातं

आज रात्री तुमची वीज कापली जाईल, अशा आशयाचे बनावट संदेश पाठवून सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे.

Fake Electricity Bill Scam: ‘आज रात्री तुमची वीज कापली जाईल?’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? थांबा! आधी हे वाचा, नाहीतर रिकामं होईल बँक खातं

Fake Electricity Bill Scam: राज्यात थकीत वीज बिलाच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. "आज रात्री तुमची वीज कापली जाईल," अशा आशयाचे बनावट संदेश पाठवून सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) 'X' (ट्विटर) वर अधिकृत पोस्ट शेअर करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वैयक्तिक क्रमांकावरून येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका
डीजीआयपीआरने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL/महावितरण) कधीही कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत संदेश पाठवत नाही. फसव्या मेसेजमध्ये दिलेले फोन नंबर खोटे असून, त्यावर नागरिकांनी चुकूनही संपर्क साधू नये.

फसवणुकीची पद्धत 
सायबर चोरटे तातडीने पैसे भरण्यास सांगतात आणि एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यास भाग पाडतात. एकदा का नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकले की, लिंकद्वारे किंवा ॲप डाऊनलोड करायला सांगून बँक खाते रिकामे केले जाते.

अधिकृत मेसेज ओळखण्याची खून
महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:

अधिकृत आयडी: महावितरणकडून येणारे सर्व अधिकृत एसएमएस हे केवळ "VM-MSEDCL" किंवा अशाच नोंदणीकृत एसएमएस आयडीद्वारे पाठवले जातात.

वैयक्तिक संपर्क नाही: कोणताही महावितरण अधिकारी आपल्या खाजगी नंबरवरून वीज बिल भरण्यासाठी किंवा जोडणी कापण्यासाठी दबाव आणत नाही.

संकेतस्थळावर माहिती: अधिक माहिती आणि तक्रारींसाठी ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा.

हेही वाचा – Reels Cyber Crime: व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंक्स वरून Instagram रिल्स पाहताय? जरा जपून! मेटाने दिली धोक्याची घंटा

नागरिकांसाठी विशेष सूचना
जर तुम्हालाही "Your electricity supply will be disconnected tonight" असा मेसेज आला असेल, तर तो तातडीने डिलीट करा किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा खाजगी नंबरवर आपली बँक डिटेल्स शेअर करू नका. कडक उन्हाळ्याच्या काळात वीज जाण्याच्या भीतीने अनेक नागरिक घाईघाईत पैसे भरतात, याचाच फायदा हे सायबर गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळे सावध राहा आणि आपली कष्टाची कमाई सुरक्षित ठेवा. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number