TET Exam Postponed: TET पेपरफुटी प्रकरणात हरियाणा आणि बिहार कनेक्शन उघड; 1.5 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे 4 संच, मोबाईल फोन आणि डेबिट कार्ड्स जप्त करण्यात आले आहेत.

TET Exam Postponed: TET पेपरफुटी प्रकरणात हरियाणा आणि बिहार कनेक्शन उघड; 1.5 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

TET Exam Postponed: महाराष्ट्रात शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 28 जून रोजी होणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) तूर्तास पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातून परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय बळावल्यामुळे हा कायदेशीर पाऊल उचलण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे 4 संच, मोबाईल फोन आणि डेबिट कार्ड्स जप्त करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नपत्रिकांची पडताळणी करून त्या मूळ प्रश्नपत्रिकाच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाघोटाळ्याच्या तपासासाठी 20 अधिकाऱ्यांच्या SIT ची स्थापना
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या या प्रश्नपत्रिकांची विक्री करून तब्बल 1.5 कोटी रुपये कमावण्याचा आरोपींचा कट होता. या रॅकेटशी संबंधित अनेक मोठे आर्थिक व्यवहारही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये डीसीपी पवन बनसोडे आणि 2 एसीपींसह एकूण 20 अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, हे पथक आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहे.

आरोपींमध्ये हरियाणा आणि बिहारच्या तरुणांचा समावेश
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंतरराज्यीय टोळीचे धागेदोरे हरियाणा आणि बिहार राज्यांशी जोडलेले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 1 जण हरियाणाचा रहिवासी असून, इतर 2 जण बिहारचे रहिवासी आहेत. हे सर्व आरोपी दिल्लीहून थेट ठाण्यात प्रश्नपत्रिकांची विक्री करण्याच्या उद्देशाने आले होते. या आरोपींना महाराष्ट्रात प्रश्नपत्रिका कोणापर्यंत पोहोचवायच्या होत्या आणि मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध सध्या पोलिसांचे पथक घेत आहे.

हेही वाचा – Mumbai News: मुंबईत मोठा घातपाताचा कट उधळला; उंदीर मारण्याच्या गोळ्या व झिंक फॉस्फाईड जप्त, फय्याज होता मास्टरमाईंड?

केंद्रीय विद्यालयांमध्ये नोकरीचे आमिष 
या पेपरफुटीच्या जाळ्यात केवळ दलालच नव्हे, तर काही शिक्षकांचाही सहभाग असल्याचा संशय असून त्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रश्नपत्रिका थेट दिल्लीहून आणल्या गेल्या होत्या आणि उमेदवारांना केंद्रीय विद्यालयांमध्ये (Kendriya Vidyalayas) हक्काची नोकरी मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवण्यात आले होते. पोलिसांनी अतिशय गुप्तपणे सापळा रचून भिवंडीतील कोंगाव परिसरात या आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा पुढील तपास SIT करत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number