Hardik Pandya: वानखेडेच्या पडद्यामागच्या नायकांसाठी हार्दिक पंड्या धावला; 11 कर्मचाऱ्यांना वाटले प्रत्येकी 10 लाखांचे धनादेश

वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफच्या कष्टाची दखल घेत हार्दिकने तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची भरघोस मदत केली आहे.

Hardik Pandya: वानखेडेच्या पडद्यामागच्या नायकांसाठी हार्दिक पंड्या धावला; 11 कर्मचाऱ्यांना वाटले प्रत्येकी 10 लाखांचे धनादेश

Hardik Pandya: IPL 2026 चा थरार सुरू व्हायला अवघे 24 तास उरले असताना, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने आपल्या दातृत्वाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफच्या कष्टाची दखल घेत हार्दिकने तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची भरघोस मदत केली आहे. मैदानावर सराव करताना दिलेल्या शब्दाला जागत हार्दिकने ही मदत प्रत्यक्ष कृतीत उतरवली असून, त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रात्रभर राबणाऱ्या हातांचा सन्मान; सरावासाठी केलेल्या मेहनतीचे चीज
मिळालेल्या माहितीनुसार, T20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीसाठी हार्दिक पंड्या वानखेडे स्टेडियमवर रात्री उशिरापर्यंत कसून सराव करत होता. हार्दिकच्या सरावात कोणतीही उणीव भासू नये आणि खेळपट्टी उत्तम राहावी, यासाठी मैदानावरील कर्मचाऱ्यांनी (Ground Staff) रात्रंदिवस रक्ताचे पाणी केले. या कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि अहोरात्र कष्ट पाहून भारावलेल्या हार्दिकने त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते, जे त्याने आता पूर्ण केले आहे.

दिलेला शब्द पाळला!  
हार्दिकने वानखेडे स्टेडियमच्या 11 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे धनादेश (Checks) सुपूर्द केले आहेत. "तुम्ही माझ्या सरावासाठी रात्रभर राबलात, ही तुमच्या कष्टाची छोटीशी पावती आहे," अशा भावना व्यक्त करत हार्दिकने ही मदत दिली. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा होते, मात्र पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाची अशा प्रकारे दखल घेतल्यामुळे हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा – IOC Bans Transgender Women : धक्कादायक! ऑलिम्पिकमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना प्रवेश नाकारला, IOC च्या निर्णयाने सर्वांना धक्का

मुंबई इंडियन्सचे सहाव्या जेतेपदाचे लक्ष्य; 'केकेआर'विरुद्ध पहिला सामना
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स यंदा नव्या जोमाने मैदानात उतरत आहे. गेल्या दोन हंगामांतील निराशाजनक कामगिरी विसरून, सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी संघ सज्ज झाला आहे. मुंबईचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध होणार असून, या मोठ्या सामन्यापूर्वी हार्दिकने केलेल्या या मदतीने संघाचे आणि मैदानातील कर्मचाऱ्यांचे मनोबल नक्कीच उंचावले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number