IND-SA T20 Squad: हार्दिक पंड्याचे टी-20 संघात पुनरागमन; गिल फिटनेसनुसार खेळणार

हार्दिक पंड्या पुन्हा भारतीय टी-20 संघात परतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

IND-SA T20 Squad: हार्दिक पंड्याचे टी-20 संघात पुनरागमन; गिल फिटनेसनुसार खेळणार

IND-SA T20 Squad: दोन महिन्यांहून अधिक काळ दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्या पुन्हा भारतीय टी-20 संघात परतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. भारताचा उपकर्णधार शुभमन गिल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. कोलकात्यातील पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या मान दुखापतीमुळे तो अद्याप पूर्णपणे बरा नसला तरी त्याचा अंतिम सहभाग बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल. या मालिकेत सूर्यकुमार यादव कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहेत.

हार्दिकचे दमदार पुनरागमन 

मंगळवारी हार्दिक पंड्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी खेळताना दमदार पुनरागमन केले. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 42 चेंडूत नाबाद 77 धावा करत चमकदार खेळी केली. गोलंदाजीतही त्याने 52 धावांत 1 बळी घेतला. आशिया कपच्या 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यानंतर हा त्याचा पहिला सामना होता.

हेही वाचा – Virat Kohli Century : कोहलीची विराट कामगिरी! दोन वर्षांनंतर बॅक टू बॅक 2 ODI सेंच्युरी

रिंकू सिंग आणि नितीश रेड्डी बाहेर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या रिंकू सिंग व अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांना या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. रिंकूला ब्रिस्बेनमधील शेवटच्या सामन्यासाठी इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. परंतु, पावसामुळे सामना रद्द झाला.

सामन्यांचे वेळापत्रक

भारत–दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्यांची मालिका खालीलप्रमाणे खेळली जाणार आहे:

9 डिसेंबर – कटक
11 डिसेंबर – न्यू चंदीगड
14 डिसेंबर – धर्मशाळा
17 डिसेंबर – लखनौ
19 डिसेंबर – अहमदाबाद

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली असून भारत एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारताच्या टी-20 संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश असणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number