Maharashtra Day 2026 Wishes: महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्साह! मराठी अस्मिता आणि श्रमिकांच्या सन्मानासाठी खास शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश आम्ही तुम्हाला सुचवत आहोत..

Maharashtra Day 2026 Wishes: महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्साह! मराठी अस्मिता आणि श्रमिकांच्या सन्मानासाठी खास शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

Happy Maharashtra Din 2026 Wishes in Marathi : प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी अत्यंत अभिमानाचा असलेला 1 मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यानिमित्त आपल्या राज्याचा गौरवशाली वारसा आणि कष्टकऱ्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी अनेक लहान-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंगल दिनाचे औचित्य साधून आपल्या मित्र-परिवाराला आणि सहकाऱ्यांना पाठवण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जेणेकरून या ऐतिहासिक दिनाचा स्वाभिमान आणि श्रमिकांप्रती असलेली कृतज्ञता डिजिटल माध्यमातून अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येईल.
 

मराठमोळे शुभेच्छा संदेश

1. जिथे छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत आहे, त्या महाराष्ट्राला वंदन! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

2. जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

3. जन्मलो ज्या मातीत ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत ते गीत मराठी… सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

4. दगड होईन तर सह्याद्रीचा माती झालो तर महाराष्ट्राची तलवार झालो तर आई भवानीची होईन माझ्या महाराष्ट्राचेच गुणगान गाईन… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …!

5. गड-किल्ल्यांचा इतिहास जागे, मराठ्यांचा पराक्रम गाजे, महाराष्ट्र दिन साजरा करूया, स्वाभिमानाचा झेंडा फडकवूया! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

7. मराठी अस्मिता जपणारा, महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

8. बहु असोत सुंदर संपन्न की महा… प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

9. महान संतांची जन्मभूमि विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम,आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा…!

10. मराठी अस्मिता, संस्कृती आणि अभिमान जपणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा…! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र

हेही वाचा – 1 May 2026 New Rules : 1 मे पासून LPG गॅस बुकिंग, क्रेडिट कार्ड नियम, ऑनलाईन गेमिंगच्या नियमांत होणार बदल; जाणून घ्या सविस्तर

11. महाराष्ट्र दिन म्हणजे शौर्य, संस्कृती आणि अभिमानाचा उत्सव! महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांना प्रेम आणि अभिमानाच्या शुभेच्छा!

12. आपल्या महाराष्ट्राच्या गौरवाला सलाम! आपल्या मातीत, आपल्या भाषेत,आपल्या महाराष्ट्रात अभिमानाने जगूया! महाराष्ट्र दिन 2026 च्या शुभेच्छा

13. महाराष्ट्र दिनाच्या या पवित्र दिवशी प्रत्येक मराठी मनाला सलाम! प्रत्येक मराठी मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आणि अभिमान कायम राहो! आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सदैव उजळत राहो हीच शुभेच्छा!

14. कामगार दिन 2026 निमित्त सर्व श्रमिक बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या मेहनतीला मानाचा सलाम! सुखी आणि समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा!

15. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मेहनतीला आणि समर्पणाला सलाम! प्रत्येक यशामागे तुमच्या कष्टांचा वाटा असतो कामगार दिनाच्या शुभेच्छा! 

16. श्रमिकांच्या घामाला सन्मान देऊया, राष्ट्राच्या उभारणीत त्यांच्या योगदानाचा गौरव करूया. सर्व कष्टकरी बांधवांना कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

17. तुमचे हात हे केवळ काम करत नाहीत, तर ते देशाचे भविष्य घडवतात. तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला माझा सलाम. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

18. श्रम हीच आहे खरी पूजा, कष्टाविना जीवनाला नाही मजा. जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व श्रमिकांना मानाचा मुजरा!

19. ज्यांच्या अहोरात्र मेहनतीवर हे जग चालते, अशा प्रत्येक हातांचा आज सन्मान करण्याचा दिवस. जागतिक कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

20. कष्ट ज्यांच्या नसांत आहे, यश त्यांच्याच हातात आहे. जगाच्या प्रगतीचा कणा असलेल्या सर्व कामगार बांधवांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा – Railway News : विदर्भ-कोकण प्रवाशांसाठी गुड न्यूज! 24 डब्यांची नागपूर-मडगाव एक्सप्रेस कायमस्वरूपी धावणार; 'हे' आहेत प्रमुख थांबे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number