Gudhi Padwa 2026 : ‘पराभव’ संवत्सराचा प्रारंभ; जाणून घ्या याचे धार्मिक महत्त्व, गुढी उभारण्याची शुभ वेळ आणि आरोग्याचे गुपित

हिंदू कालमापन पद्धतीनुसार दरवर्षी संवत्सराचे नाव बदलत असते. यंदा 'पराभव' नावाचे संवत्सर सुरू होत आहे. जाणून घ्या, संवत्सर म्हणजे काय आणि ते कसे ठरते..

Gudhi Padwa 2026 :  ‘पराभव’ संवत्सराचा प्रारंभ; जाणून घ्या याचे धार्मिक महत्त्व, गुढी उभारण्याची शुभ वेळ आणि आरोग्याचे गुपित

Gudhi Padwa 2026 : हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा यंदा गुरुवार, 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी केवळ नवीन वर्षाची सुरुवातच होत नाही, तर शालिवाहन शके 1948 चा प्रारंभही होणार आहे. यंदाच्या नवीन संवत्सराचे नाव 'पराभव' असे असून, पहाटे अमावास्या असल्याने गुढी उभारण्याच्या वेळेबाबत शास्त्रोक्त माहिती घेणे आवश्यक आहे.

गुढी उभारण्याची शुभ वेळ आणि तिथी
यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर काही वेळ अमावास्या असल्याने भाविकांमध्ये संभ्रम आहे. 19 मार्च 2026 रोजी सकाळी 06 वाजून 45 मिनिटांनी सूर्योदय होईल, मात्र सकाळी 06 वाजून 53 मिनिटांपर्यंत अमावास्या असणार आहे. त्यामुळे अमावास्या संपल्यानंतर, म्हणजेच सकाळी 06 वाजून 53 मिनिटांनंतर प्रतिपदा सुरू होईल. यानंतर गुढी उभी करावी. याच वेळेनंतर पंचांगस्थ गणपती पूजन, श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्रारंभ करणे शास्त्रोक्त ठरेल. जरी ही क्षय तिथी असली तरी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

'पराभव' संवत्सर आणि कालचक्राचे महत्त्व
हिंदू कालमापन पद्धतीनुसार दरवर्षी संवत्सराचे नाव बदलत असते. यंदा 'पराभव' नावाचे संवत्सर सुरू होत आहे. संवत्सर हे एक कालचक्र असून, गुरूच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या कालावधीवरून ते ठरवले जाते. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो. शालिवाहन शके 1948 च्या प्रारंभासह हे नवीन वर्ष सुख-समृद्धी घेऊन येईल, अशी श्रद्धा आहे. साठ वर्षांच्या चक्रात संवत्सरांची पुनरावृत्ती होत असते, ज्याला महाकालाचा एक भाग मानले जाते.

हेही वाचा – Why Copper Kalash On Gudi: गुढीपाडव्याला गुढीवर तांब्याचाच कलश का ठेवतात? पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेमागचं कारण जाणून घ्या

श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्रारंभ
संपूर्ण मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. यातील पहिले नवरात्र चैत्र महिन्यात साजरे केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे नवरात्र मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्र किंवा वासंतिक नवरात्राला सुरुवात होते. भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांनी वानरराज वालीच्या अत्याचारातून प्रजेला मुक्त केले, तेव्हा प्रजेने विजयाची गुढी उभारली होती, अशी एक महत्त्वाची मान्यता आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची—शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री—पूजा केली जाते. चैत्र शुद्ध नवमीला, म्हणजेच रामनवमीला या उत्सवाची सांगता होते.

आरोग्यदायी परंपरा आणि आयुर्वेद
गुढीपाडव्याचा सण केवळ धार्मिक नसून आरोग्याच्या दृष्टीनेही विज्ञाननिष्ठ आहे. उन्हाळ्याची सुरुवात होत असताना शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या दिवशी कडुनिंबाच्या पानांची चटणी खाण्याची प्रथा आहे. आंध्र प्रदेशात दिला जाणारा विशेष प्रसाद आणि कडुनिंबाचे सेवन त्वचारोग निवारण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते. तसेच, आंब्याच्या सेवनाने कॅल्शियम मिळते. निसर्गातील बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीर सज्ज व्हावे, हाच या परंपरांमागचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा – Gudhi Padwa 2026: गुढीसाठी 'या' रंगाची साडी नेसवा; घरात नांदेल सुख-समृद्धी, जाणून घ्या सणाचं महत्त्व आणि शास्त्रोक्त पद्धत 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number