New Trains Launched: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! देशात एकाच दिवशी 4 नवीन गाड्या सुरू; महाराष्ट्रासह 4 राज्यांना होणार मोठा फायदा

सोमवार एकाच दिवशी 4 नवीन ट्रेन सेवांचे उद्घाटन केले. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड ते मुंबई (LTT) एक्सप्रेस, नांदेड ते टनकपूर एक्सप्रेस आणि ओडिशातील पुरी ते कोरापुट एक्सप्रेसचा समावेश आहे.

New Trains Launched: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! देशात एकाच दिवशी 4 नवीन गाड्या सुरू; महाराष्ट्रासह 4 राज्यांना होणार मोठा फायदा

New Trains Launched: देशातील रेल्वे संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, सोमवार एकाच दिवशी 4 नवीन ट्रेन सेवांचे उद्घाटन केले. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड ते मुंबई (LTT) एक्सप्रेस, नांदेड ते टनकपूर एक्सप्रेस आणि ओडिशातील पुरी ते कोरापुट एक्सप्रेसचा समावेश आहे. याशिवाय, आज संध्याकाळी दक्षिण ओडिशा आणि गुजरातला जोडणारी 'ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस' ही चौथी ट्रेन देखील सुरू होणार आहे.

या नवीन गाड्यांमुळे विविध राज्यांमधील दळणवळण सुलभ होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.

1.नांदेड-एलटीटी-नांदेड एक्सप्रेस (Nanded-LTT Express)
ही ट्रेन महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला थेट मुंबईशी जोडणार आहे. यामुळे नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा, जळगाव, नाशिक, ठाणे आणि मुंबई उपनगरातील प्रवाशांची सोय होईल.

प्रमुख थांबे: प्रवासादरम्यान ही ट्रेन पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी आणि कल्याण या स्थानकांवर दोन्ही बाजूंनी थांबेल.

2. नांदेड-टनकपूर-नांदेड एक्सप्रेस (Nanded-Tanakpur Express)
महाराष्ट्र आणि उत्तराखंड राज्यांना जोडणारी ही एक महत्त्वाची लांब पल्ल्याची ट्रेन ठरेल. या गाडीमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशा 4 राज्यांमधील प्रवाशांना फायदा होणार आहे.

प्रमुख थांबे: ही ट्रेन प्रवासादरम्यान हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, राणी कमलापती भोपाळ, बिना, ललितपूर, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वाल्हेर, धौलपूर, आग्रा, मथुरा, कासगंज, बुडौन, बरेली, इज्जतनगर आणि पिलीभीत या स्थानकांवर थांबेल.

3. पुरी-कोरापुट-पुरी एक्सप्रेस (Puri-Koraput Express)
ओडिशा राज्यातील रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन ओडिशाचा किनारी भाग आणि दक्षिण ओडिशा यांना थेट एकमेकांशी जोडेल.

प्रमुख थांबे: ही नवीन गाडी दोन्ही दिशांनी धावताना खुर्दा रोड, भुवनेश्वर, अंगुल, संबलपूर, बोलांगीर, दामनजोडी आणि लक्ष्मीपूर रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.

हेही वाचा – Chiplun News: 'पाकिस्तानी फॅशन'ची जाहिरात महागात पडली! व्हायरल रीलनंतर चिपळूणमध्ये तणाव, दुकानदाराला बेड्या

आज संध्याकाळी धावणार चौथी ट्रेन: ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस
रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विस्तार करत रेल्वे मंत्री आज संध्याकाळी 4:00 वाजण्याच्या सुमारास ब्रह्मपूर (ओडिशा) ते उधना (सुरत, गुजरात) दरम्यान धावणाऱ्या आधुनिक 'अमृत भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवतील. या नवीन अमृत भारत ट्रेनमुळे दक्षिण ओडिशा आणि देशाच्या पश्चिम भागात (गुजरात) राहणाऱ्या नागरिकांमधील लांब पल्ल्याचा प्रवास थेट आणि सोयीचा होणार आहे. कामासाठी व व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number