Pune Airport: पुणेकरांसाठी गुड न्यूज! 1 मेपासून पुणे विमानतळावरून उड्डाणांची संख्या वाढली; ‘या’ 3 शहरांसाठी सुरू होणार थेट विमानसेवा

1 मे पासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3 नवीन शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे.

Pune Airport: पुणेकरांसाठी गुड न्यूज! 1 मेपासून पुणे विमानतळावरून उड्डाणांची संख्या वाढली; ‘या’ 3 शहरांसाठी सुरू होणार थेट विमानसेवा

Pune Airport: पुणेकरांचा हवाई प्रवास आता अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. 1 मे पासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3 नवीन शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये सोलापूर, मंगळुरू आणि बागडोगरा या शहरांचा समावेश असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी थेट दक्षिण आणि ईशान्य भारतापर्यंत विस्तारणार आहे.

दैनंदिन उड्डाणांच्या संख्येत वाढ
विमानतळाच्या उन्हाळी वेळापत्रकात पुणे विमानतळाला 15 नवीन स्लॉट्स मिळाले आहेत. यामुळे उड्डाणांची संख्या आता 220 वरून 235 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व नवे स्लॉट्स दिवसाच्या वेळेतील असल्याने प्रवाशांना रात्रीच्या प्रवासाचा त्रास वाचणार असून दिवसभर विविध विमान पर्याय उपलब्ध असतील. मंगळुरू आणि बागडोगरासाठी आता दररोज विमान उपलब्ध असेल, तर चेन्नई, बेंगळुरू आणि पाटणा या मार्गांवर वाढती गर्दी लक्षात घेता विमानांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

तिरुपती देवदर्शन आता अधिक सुलभ
भाविकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे पुणे-सोलापूर-तिरुपती हा नवा हवाई मार्ग सुरू होत आहे. 'UDAN' योजनेच्या माध्यमातून ही सेवा जोडली गेल्यामुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता तासनतास प्रवास करावा लागणार नाही. सोलापूरच्या माध्यमातून ही सेवा पुण्याला दक्षिण भारताशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल.

पुणे: प्रादेशिक कनेक्टिव्हिटीचे मुख्य केंद्र
पुणे विमानतळाचे संचालक संतोष धोके यांच्या मते, पुण्याला देशातील एक प्रमुख 'कनेक्टिंग हब' बनवण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असलेल्या बागडोगराशी पुणे थेट जोडले गेल्यामुळे पर्यटन आणि व्यापाराला नवीन संधी प्राप्त होतील. यापूर्वीच उडान योजनेतून नांदेड, जळगाव आणि सिंधुदुर्ग सारखी शहरे पुण्याशी हवाई मार्गाने जोडली गेली आहेत.

हेही वाचा – Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वरात श्रद्धेचा बाजार; 200 रुपयांचा VIP पास 12 हजारांना; दलालांच्या 'या' मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

पायाभूत सुविधांसाठी 12,000 कोटींची तरतूद
देशांतर्गत हवाई सेवा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने 12,000 कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. या निधीतून प्रामुख्याने टायर-2 आणि टायर-3 शहरांमधील पायाभूत सुविधा आणि धावपट्ट्यांचा विकास केला जाणार आहे. या गुंतवणुकीचा मोठा फायदा पुणे विमानतळाच्या भविष्यातील विस्तारासाठी आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number