Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची चाचणी पूर्ण; ‘या’ महिन्यात सुरू होणार प्रवास

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. <br/>

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची चाचणी पूर्ण; ‘या’ महिन्यात सुरू होणार प्रवास

Pune Metro: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन 3) या मार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या जून महिन्यापासून या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे.

पहिल्या टप्प्यात 12 स्थानकांचा प्रवास
पीएमआरडीए (PMRDA) ने मे अखेरपर्यंत या मार्गावरील पहिल्या 12 स्थानकांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 23 स्थानके असली, तरी सुरुवातीला महत्त्वाच्या 12 स्थानकांवरून मेट्रो धावेल. उर्वरित 11 स्थानकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांचे (Entry-Exit) काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

सप्टेंबरमध्ये संपूर्ण मार्गिका कार्यान्वित
पीएमआरडीएचे नवनियुक्त आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यांच्या माहितीनुसार, जून 2026 मध्ये पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांसह सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच सप्टेंबर 2026 मध्ये संपूर्ण 23.2 किमी लांबीची मार्गिका प्रवाशांसाठी खुली होणार आहे. सध्या प्रकल्पाचे 94.2 टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

चाचण्या अंतिम टप्प्यात
मेट्रोच्या बहुतांश तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या असून, सध्या केवळ 'सिग्नलिंग'च्या तांत्रिक प्रक्रिया सुरू आहेत. आयुक्तांनी स्वतः या मार्गाची पाहणी करून कंत्राटदारांना कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. जूनपर्यंत प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व आवश्यक पायाभूत कामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

हेही वाचा – Tukaram Mundhe Mother Passed Away : तुकाराम मुंढे यांना मातृशोक! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; तातडीने पुण्याकडे रवाना

वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो मार्गिका वरदान ठरणार आहे. मेट्रो सुरू होताच हिंजवडी आणि वाकड परिसरातील रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होऊन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number