Pune Water Supply Update: पुणेकरांसाठी गूड न्यूज! तूर्तास कोणतीही पाणीकपात नाही; खडकवासला धरण साखळीत समाधानकारक साठा जमा

आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 7 ते 12 जुलै दरम्यान तात्पुरती स्थगित केलेली पाणीकपात सोमवारपासून पुन्हा सुरू होणार का, अशी भीती नागरिकांमध्ये होती.

Pune Water Supply Update: पुणेकरांसाठी गूड न्यूज! तूर्तास कोणतीही पाणीकपात नाही; खडकवासला धरण साखळीत समाधानकारक साठा जमा

Pune Water Supply Update: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याच्या चिंतेतून मोठा दिलासा मिळाला असून, महापालिकेने शहरात तूर्तास कोणतीही पाणीकपात लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 7 ते 12 जुलै दरम्यान तात्पुरती स्थगित केलेली पाणीकपात सोमवारपासून पुन्हा सुरू होणार का, अशी भीती नागरिकांमध्ये होती. मात्र, जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकवासला साखळीतील जलाशयांमध्ये सध्या 16.64 ते 16.77 TMC इतका उपयुक्त साठा जमा झाला आहे. 

पाण्याच्या या उपलब्धतेमुळे तूर्तास दिवसाआड पाणी देण्याचा कोणताही विचार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, पुढील आठवड्यात होणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

गेल्या वर्षापेक्षा जलसाठा कमी 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत 500 ते 600 मिमी कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून, 24 तासांत पावसाची नोंद नगण्य झाली आहे. पुढील 5 ते 6 दिवस पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण क्षमता 57.52 टक्के म्हणजेच 16.77 TMC झाली आहे, जी गेल्या वर्षी याच काळात 20.79 TMC (71.31 टक्के) इतकी होती. 

हेही वाचा – Medha Manjrekar : हॉस्पिटलमधील बेड, चेहऱ्यावर स्मित आणि डोक्यावर केस नाहीत; मेधा मांजरेकर यांच्या पोस्टने खळबळ

धरणनिहाय साठ्याचा विचार करता खडकवासला धरणात 1.94 TMC, पानशेतमध्ये 6.35 TMC, वरसगावमध्ये 7.03 TMC आणि टेमघर धरणात 1.44 TMC पाणी उपलब्ध आहे. यंदाचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीसा कमी असल्याने आणि पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलसंपदा आणि महापालिका विभागाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number