EPFO Interest Update: PF खातेधारकांसाठी गूड न्यूज! 8.25 टक्के व्याजाचे पैसे ‘या’ महिन्यात होणार जमा

'एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन'ने (EPFO) आर्थिक वर्ष 2025-26 साठी व्याजदराची घोषणा केली असली, तरी अद्याप अनेकांच्या पासबुकमध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत.

EPFO Interest Update: PF खातेधारकांसाठी गूड न्यूज! 8.25 टक्के व्याजाचे पैसे ‘या’ महिन्यात होणार जमा

EPFO Interest Update: देशातील कोट्यवधी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपल्या भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार, याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नोकरदारांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन'ने (EPFO) आर्थिक वर्ष 2025-26 साठी व्याजदराची घोषणा केली असली, तरी अद्याप अनेकांच्या पासबुकमध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. हा निधी कधी क्रेडिट होणार, विलंबाचे कारण काय आणि नवीन नियमांमुळे काय फायदे होणार, याचा सविस्तर आढावा घेऊया.

आर्थिक वर्ष 2026 साठी 8.25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब
मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या EPFO च्या 'सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज' (CBT) च्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2025-26 या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना 8.25 टक्के दराने वार्षिक व्याज देण्याची शिफारस मंजूर करण्यात आली होती. यानंतर 2 मार्च रोजी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या निर्णयाला अधिकृत संमती दिली. मात्र, घोषणा झाल्यानंतर सर्व खात्यांमध्ये प्रत्यक्ष रक्कम दिसायला काही तांत्रिक प्रक्रियेमुळे थोडा वेळ लागतो.

कोट्यवधी खात्यांमुळे प्रक्रियेला विलंब 
PF चे व्याज थेट खात्यात जमा होण्यापूर्वी केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक असते. त्यानंतर, EPFO कडून देशातील लाखो नोकरदारांच्या खात्यांची तपासणी करून नोंदी अद्ययावत केल्या जातात. या मोठ्या प्रक्रियेमुळे व्याज जाहीर होणे आणि ते पासबुकमध्ये दिसणे यात काही महिन्यांचा गॅप पडतो. परंतु, खातेधारकांनी काळजी करण्याची गरज नाही. नोंदी उशिरा झाल्या तरीही व्याजाची पूर्ण रक्कम गणनेनुसार सुरक्षितपणे मिळते.

'या' महिन्यांत खात्यात जमा होणार पैसे 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल. सर्व कर्मचाऱ्यांची पासबुके एकाच वेळी अपडेट होत नसल्याने काहींना थोडी वाट पाहावी लागू शकते. जेव्हा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, तेव्हा पासबुकच्या शेवटी "Int. Updated up to 31/03/2026" अशी नोंद दिसेल. ही स्थिती तुम्ही UMANG ॲप, EPFO पोर्टल किंवा मिस्ड कॉल आणि SMS सेवेद्वारे सहज घरबसल्या तपासू शकता.

हेही वाचा – Home Loan Options: घाईघाईत गृहकर्ज घेताय? आधी जाणून घ्या 'या' 3 कर्ज रचना; एका चुकीमुळे वाढू शकतो बँक हप्त्यांचा प्रचंड भार

थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर होणार
भविष्यात पीएफमधून पैसे काढणे अधिक सोपे करण्यासाठी संस्था 'EPFO 3.0' हे हायटेक प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन प्रणालीमुळे सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम थेट स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येईल. ही सोय उमंग (UMANG) ॲपवर उपलब्ध केली जाईल, जिथे तुम्हाला काढता येणारी अचूक रक्कम त्वरित दिसेल. तसेच, यासाठी QR कोड-आधारित ट्रान्सफरची आधुनिक सुविधाही आणली जाणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number