FD Interest Rates Hike: गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ सरकारी बँकेने वाढवले FD चे व्याजदर

हे नवीन दर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींसाठी लागू असून आज, 18 मे 2026 पासून अंमलात आले आहेत.<br/>

FD Interest Rates Hike: गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ सरकारी बँकेने वाढवले FD चे व्याजदर

FD Interest Rates Hike: सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या ‘बँक ऑफ इंडिया’ने (Bank of India) आपल्या मुदत ठेव (FD) दरांमध्ये वाढ करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी 2025 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात एकूण 125 आधार अंशांची (basis points) कपात केली आहे. या काळात बहुतांश बँका व्याजदर कमी करत असताना बँक ऑफ इंडियाने मात्र प्रवाहाविरुद्ध जात मध्यम आणि दीर्घकालीन ठेवींवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींसाठी लागू असून आज, 18 मे 2026 पासून अंमलात आले आहेत.

ज्येष्ठ आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना विशेष फायदा
बँकेने जाहीर केलेल्या नवीन दरपत्रकानुसार, ज्येष्ठ नागरिक आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांच्या तुलनेत अधिक व्याज मिळणार आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर सर्वसामान्यांना 6.50 टक्के व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.00 टक्के आणि 80 वर्षांवरील अति-ज्येष्ठ नागरिकांना 7.15 टक्के व्याज दिले जाईल. 2 वर्षे ते 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी हे दर अनुक्रमे 6.60 टक्के, 7.10 टक्के आणि 7.25 टक्के असे निश्चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Stock Market Closing Bell: मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स दिवसाच्या नीचांकी पातळीवरून 1100 अंशांनी वधारला

3 वर्षांच्या ठेवींवर सर्वाधिक परतावा
बँकेने 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देऊ केला आहे. या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 6.70 टक्के व्याज मिळेल. विशेष म्हणजे, याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.45 टक्के आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के इतका आकर्षक व्याजदर मिळणार आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या आणि नियमित उत्पन्नावर अवलंबून असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही दरवाढ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number