Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! BCCI ने दिली ‘ही’ खास परवानगी

पंड्या सध्या बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये पुनर्वसन पूर्ण करून मैदानावर परत आला आहे. तो 21 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत COE मध्ये प्रशिक्षण घेत होता. <br/>

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! BCCI ने दिली ‘ही’ खास परवानगी

Hardik Pandya: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला बीसीसीआयने पुन्हा गोलंदाजी करण्याची परवानगी दिली आहे. पंड्या सध्या बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये पुनर्वसन पूर्ण करून मैदानावर परत आला आहे. तो 21 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत COE मध्ये प्रशिक्षण घेत होता. 

सध्या उपलब्ध माहितीनुसार, COE ने हार्दिकला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्यास आणि फलंदाजी करण्यास परवानगी दिली आहे. त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका निश्चित झाली असून, मालिकेपूर्वी पंड्या 2 टी20 सामने देखील खेळेल. तो 2 डिसेंबर रोजी पंजाबविरुद्ध आणि 4 डिसेंबर रोजी गुजरातविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 

हेही वाचा – Lanka Premier League: लंका प्रीमियर लीगच्या वेळापत्रकाबाबत मोठी बातमी! टी-20 विश्वचषक तयारीमुळे स्पर्धा 7 महिन्यांनी पुढे ढकलली

भारतीय क्रिकेट निवडकर्ते प्रज्ञान ओझा हार्दिकच्या गोलंदाजी, फलंदाजी आणि सामना फिटनेसवर लक्ष ठेवतील. बीसीसीआयने त्याला पूर्ण जबाबदारी दिलेली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हार्दिक केवळ सामना फिटनेस सिद्ध करेल असे नाही तर त्याची कामगिरी टीमला विजयाची खात्री देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  

हेही वाचा – BCCI Board Meeting: BCCI ने अचानक बोलावली बैठक! गौतम गंभीर आणि आगरकर यांच्याशी करणार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?

तथापि, हार्दिकसाठी सामना सोपा नसणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबचा सामना असताना त्याला अभिषेक शर्मा सारख्या धाकट्या आणि विध्वंसक फलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. मागील सामन्यात अभिषेकने बंगालविरुद्ध फक्त 32 चेंडूत शतक ठोकले होते आणि 16 षटकार खेचले होते, त्यामुळे हार्दिकच्या कौशल्याची खरी कसोटी लागणार जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number