Online Fertilizer Booking: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता घरबसल्या होणार खतांची बुकिंग; पेरणीपूर्वीचं सरकारचा ‘पायलट प्रोजेक्ट’ सुरू

आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदा खतांची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात होती. शेतकऱ्यांची हीच चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

Online Fertilizer Booking: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता घरबसल्या होणार खतांची बुकिंग; पेरणीपूर्वीचं सरकारचा ‘पायलट प्रोजेक्ट’ सुरू

Online Fertilizer Booking: मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच राज्यभरातील बळीराजा शेतीच्या मशागतीसह बियाणे व खत खरेदीच्या गडबडीत व्यस्त झाला आहे. काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदा खतांची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात होती. शेतकऱ्यांची हीच चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून, आता मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या खतांचे बुकिंग करण्याची नवी डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात 'पायलट प्रोजेक्ट'ची सुरुवात
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि ऐन हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाने विशेष योजना आखली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डिजिटल मोहिमेची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये हा 'पायलट प्रोजेक्ट' राबवला जाईल. यासाठी शेतकऱ्यांसाठी लवकरच एक हक्काचे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन लाँच केले जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून खतांचा थेट साठा तपासणे आणि बुकिंग करणे शक्य होईल. या दोन्ही जिल्ह्यांतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, ही ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केली जाणार आहे.

हेही वाचा – Water Satbara : जलव्यवस्थापनात महाराष्ट्राचे क्रांतिकारी पाऊल; देशात पहिल्यांदाच लागू होणार 'पाण्याचा सातबारा'

इंधनाची आणि वेळेची होणार बचत 
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या आयातीवर परिणाम होऊन बाजारात टंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात होती. मात्र, सरकारच्या या नवीन ऑनलाईन बुकिंग सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेरणीच्या ऐन हंगामात खतांसाठी दुकानांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमधून शेतकऱ्यांची पूर्णपणे सुटका होईल, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना थेट घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर खतांची उपलब्धता समजेल आणि ती आरक्षित करता येईल. परिणामी, साठेबाजीला चाप बसणार आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number