Farmers Loan Waive: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कृषीमंत्र्यांनी जाहीर केली कर्जमाफीची तारीख; ‘ही’ प्रक्रिया ठरणार महत्त्वाची

सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आता स्पष्ट संकेत मिळाले असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाभ वितरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Farmers Loan Waive: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कृषीमंत्र्यांनी जाहीर केली कर्जमाफीची तारीख; ‘ही’ प्रक्रिया ठरणार महत्त्वाची

Farmers Loan Waive: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आता स्पष्ट संकेत मिळाले असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाभ वितरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील 10 दिवसांत प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. येत्या 10 दिवसांत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम आणि पेरणीपूर्वी ही घोषणा झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे

सरकारच्या सूचनांनुसार कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. विशेषतः ॲग्री स्टॅक नोंदणी, ई-केवायसी आणि इतर आवश्यक पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

काय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना?

राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. याशिवाय नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचीही तरतूद करण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.

कोणत्या कर्जांचा समावेश?

पीक कर्ज वितरणाचा अधिकार असलेल्या सहकारी, राष्ट्रीयीकृत किंवा इतर पात्र बँकांकडून घेतलेल्या कर्जांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. पात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज राज्य सरकारकडून भरले जाणार आहे.

बँकिंग क्षेत्रालाही मिळणार दिलासा

या निर्णयाचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर बँकिंग क्षेत्रालाही होणार आहे. अनेक सहकारी बँका आणि पतसंस्थांकडे मोठ्या प्रमाणात थकीत कर्जाची रक्कम अडकून आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी झाल्यानंतर ही थकबाकी शासनाकडून भरली जाणार असल्याने बँकांची वसुली वाढेल. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह विविध वित्तीय संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच थकीत कर्जखाती निकाली निघाल्याने त्यांच्या पतमानांकनावरही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Sumit Rathod : 10 लाख बियाण्यांची बीजबँक, 8 हजार वृक्षांचे रोपण, लाखो बियांणांचे विनामूल्य दान…; पर्यावरणप्रेमी पोट्टा सुमित राठोडचे प्रेरणादायी कार्य

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा आधार

खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जमाफीची प्रक्रिया मार्गी लागण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. आता शासनाकडून अधिकृत अंमलबजावणी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया कधी सुरू होते, याकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number