CIDCO House Lottery: खुशखबर! मुंबईत सिडकोची घरे स्वस्त होणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

सिडकोकडील घरांच्या किमतींमध्ये थेट दहा टक्के कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

CIDCO House Lottery: खुशखबर! मुंबईत सिडकोची घरे स्वस्त होणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

CIDCO House Lottery : नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घर खरेदीदारांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. सिडकोकडील घरांच्या किमतींमध्ये थेट दहा टक्के कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. या निर्णयामुळे नवी मुंबई परिसरात घर घेण्याची इच्छा असलेल्या हजारो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

17 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी

उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोकडील सुमारे 17 हजार घरांसाठी येत्या दोन महिन्यांत लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार आहे. किमती कमी झाल्यामुळे ही घरे अधिक परवडणारी ठरणार असून, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे.

हेही वाचा – Ajit Pawar on Scholarship: शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लाभार्थ्यांची संख्या ठरविण्यासाठी घेण्यात येणार 'हा' धोरणात्मक निर्णय

कुठल्या भागात मिळणार स्वस्त घरे?

सिडकोने नवी मुंबईतील विविध भागांमध्ये उभारलेली घरे या निर्णयाच्या कक्षेत येणार आहेत. यामध्ये खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरांचा समावेश आहे. एकूण 17 हजार घरांच्या किमती नव्या निर्णयानुसार दहा टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहेत. ही योजना प्रामुख्याने ईडब्ल्यूएस (EWS) आणि एलआयजी (LIG) प्रवर्गातील घरांसाठी लागू राहणार आहे.

हेही वाचा – Pune Ring Road News: मोठी अपडेट! मंत्री दादा भुसेंनी पुणे रिंग रोडबद्दल विधानसभेत दिली माहिती; कामाला निर्णायक गती

इच्छुकांनी कागदपत्रांची तयारी ठेवावी

नवी मुंबईचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता, सिडकोची ही घरे भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहेत. लॉटरी प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असल्याने इच्छुक नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी आतापासूनच ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. योग्य वेळी अर्ज केल्यास मुंबई महानगर परिसरात घर मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number