Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही महागली; वाचा आजचा भाव

गणेशोत्सवाच्या दिवसात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्य सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली.

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही महागली; वाचा आजचा भाव

Gold Price Today : गणेशोत्सवाच्या दिवसात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्य सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात काही शहरांमध्ये तब्बल 1,260 रुपयांपर्यंत वाढ झालेली असून दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचा भावही 1,150 रुपयांनी वधारला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सोन्याला तेजी
20 सप्टेंबर अर्थात आजच्या बाजारभावानुसार, राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,55,990 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालेला आहे. मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्यासाठी 1,55,840 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागत आहेत. मुंबई आणि कोलकता या दोन्ही ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,42,850 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,840 रुपये इतका आहे.

हेही वाचा –Ganpati Visarjan : बाप्पाला निरोप देताना घडले अघटित; संगमेश्वरमध्ये बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्रासह दिल्लीमध्ये पाहिलं तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,43,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. दुसरीकडे चेन्नई, हैदराबाद, पुणे तसेच बेंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,840 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अहमदाबाद आणि भोपाळ या शहरात 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत 1,55,850 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 1,42,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जयपूर,लखनऊ आणि चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,55,990 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 1,43,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे.

चांदीचा दर कसा?
सोन्याच्या दरासोबत चांदीच्या किमतीतही गेल्या काही दिवसांत जोरदार तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे. मागीरल आठवडाभरात चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची वाढ झालेली आहे. 20 सप्टेंबरच्या सकाळच्या दरानुसार चांदीचा भाव हा 2,55,000 रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number