Goa Dudhsagar Drowning : काळजाचा थरकाप! गोव्यातील दूधसागर नदीत 3 सख्ख्या भावांसह 4 विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या चार तरुण विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. कॉलेज सुरू होण्यापूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Goa Dudhsagar Drowning : काळजाचा थरकाप! गोव्यातील दूधसागर नदीत 3 सख्ख्या भावांसह 4 विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Goa Dudhsagar College Students Drowning : उन्हाळ्याची सुट्टी संपून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी मित्रांसोबत ट्रिपला जाण्याचा बेत चिखली येथील एकाच घरातील तीन सख्ख्या भावांसह चार जणांसाठी अखेरचा ठरला आहे. गोव्यातील कोल्लेम भागात प्रसिद्ध दूधसागर धबधब्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर पाच मित्रांचा एक ग्रुप ट्रेकिंग आणि पोहण्यासाठी गेला होता. शनिवारी (13 जून) सकाळी 10 च्या सुमारास नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या चार तरुण विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा समावेश; चिखली गावावर शोककळा
नदीत बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवकांमध्ये चिखली गावातील तीन सख्ख्या भावांचा समावेश असून त्यांची नावे रामण्णा परसू मादेर (वय 19), लक्ष्मण परसू मादेर (वय 19) आणि हिराण्णा परसू मादेर (वय 21) अशी आहेत. या दुर्घटनेत जीव गमावलेला चौथा विद्यार्थी वास्को येथील असून त्याचे नाव विजय सजिली (वय 20) असे आहे. हे सर्व तरुण सकाळी वास्को ते कुळे असा ट्रेनने प्रवास करून आले होते आणि त्यानंतर त्यांनी दूधसागर नदीपर्यंत ट्रेकिंग केले होते. यातील दोघेजण वास्को येथील एका नामांकित खाजगी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – Ahmedabad Plane Crash: 'त्या तांत्रिक त्रुटींची स्वतंत्र तपासणी करा…'; अहमदाबाद विमान अपघाताबाबत पायलट संघटनेचे PMO अन् DGCA ला पत्र

स्थानिकांचे प्रयत्न आणि दृष्टी जीवरक्षकांचे रेस्क्यू ऑपरेशन
शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कुळे येथील मेटावाडा भागात तरुण नदीत बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या मुलांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. त्यांना बुडताना पाहून स्थानिक नागरिकांनी तात्काळ वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, ज्यामध्ये पाच मित्रांपैकी एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. माहिती मिळताच पोलीस आणि 'दृष्टी जीवरक्षकांची' टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला एकाचा मृतदेह हाती लागला होता, तर उर्वरित तिघे बेपत्ता होते; परंतु मोठ्या शोधकार्यानंतर अखेर तिन्ही बेपत्ता तरुणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले.

सुट्ट्या संपण्यापूर्वीची पिकनिक ठरली अखेरची
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुट्ट्या संपायला अवघे काही दिवस उरले होते आणि लवकरच कॉलेजचे वर्ग सुरू होणार होते. त्यापूर्वीच सर्व मित्रांनी निसर्गरम्य वातावरणात ट्रेकिंग आणि पोहण्याचा आनंद घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, हा आनंद काही वेळातच अत्यंत भीषण दुर्घटनेत बदलला. कुळे पोलिसांनी या अत्यंत दुर्दैवी प्रकरणाची दखल घेत अनैसर्गिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – Indian Seafarer Death: ओमानच्या किनाऱ्यावर भारतीय खलाशाचा 'या' कारणामुळे दुर्दैवी मृत्यू; पार्थिव भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number