Artificial Intelligence : AI कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये या देशाचा दबदबा; या आहेत जगातील टॉप कंपन्या, भारताचा नंबर कितवा?

सध्या जगभरात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) क्रांतीची लाट आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात वर्चस्व गाजवण्यासाठी विकसित देशांमध्ये मोठी चुरस लागली आहे.

Artificial Intelligence :  AI कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये या देशाचा दबदबा; या आहेत जगातील टॉप कंपन्या, भारताचा नंबर कितवा?

Artificial Intelligence : सध्या जगभरात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) क्रांतीची लाट आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात वर्चस्व गाजवण्यासाठी विकसित देशांमध्ये मोठी चुरस लागली आहे. या शर्यतीत सध्या अमेरिका एकतर्फी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले असून, जगातील पहिल्या 10 सर्वात मोठ्या एआय कंपन्या एकाच देशाच्या म्हणजेच अमेरिकेच्या आहेत. मार्केट कॅपिटलायझेशननुसार (बाजार भांडवल) अमेरिकेने या क्षेत्रात इतर देशांना खूप मागे टाकले आहे. 

अमेरिकन कंपन्यांचा जागतिक दबदबा
बाजार भांडवलाच्या बाबतीत 'एनव्हिडिया' (Nvidia) ही केवळ एआय क्षेत्रातच नाही, तर जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. टॉप 10 कंपन्यांच्या यादीत अमेरिकेने आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. खालील आकडेवारीवरून हे वर्चस्व स्पष्ट होते (लाख कोटी रुपयांत):
एनव्हिडिया: 396.695
ॲपल: 347.333
अल्फाबेट: 331.216
मायक्रोसॉफ्ट: 278.990
मेटा प्लॅटफॉर्म्स: 149.723
टेस्ला: 136.643
ओरॅकल : 40.351 (अमेरिका)
पलान्टिर : 34.500 (अमेरिका)
आयबीएम : 22.286 (अमेरिका)
ॲडोब : 10.897 (अमेरिका)

चीन आणि इस्राईलची जोरदार धडपड
जगातील आघाडीच्या 63 एआय कंपन्यांचा विचार केल्यास, त्यापैकी एकट्या अमेरिकेच्या 44 कंपन्या आहेत. या स्पर्धेत चीन आणि इस्राईलनेही आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या जागतिक यादीत चीनच्या 6, इस्राईलच्या 4, तर सिंगापूर आणि यूएईच्या प्रत्येकी 2 कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी, या देशांनी एआय तंत्रज्ञानात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा – Charger Stay Plugged: तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपचा चार्जर कायम प्लगमध्येच लावून ठेवता का? या साध्या चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान

भारताची चिंताजनक स्थिती
एकीकडे तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखला जाणारा भारत मात्र या जागतिक क्रमवारीत कुठेही दिसत नाही. जगातील पहिल्या 63 कंपन्यांच्या यादीत भारताची एकही कंपनी स्थान मिळवू शकलेली नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे. भारताकडे मोठी आयटी टॅलेंट असली, तरी उत्पादन आणि संशोधनावर आधारित एआय कंपन्यांच्या बाबतीत भारत अद्याप मागे आहे. तथापि, ओपनएआय, अँथ्रोपिक आणि डेटाब्रिक्स यांसारख्या 'अनलिस्टेड' कंपन्यांमुळे या क्षेत्रात नवनवीन बदल घडत आहेत.

मार्केट कॅपिटलायझेशन आणि भविष्यातील कल
हे रँकिंग केवळ शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या आधारावर आहे. 'एनव्हिडिया'ने ज्या प्रकारे 396.695 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे, त्यावरून एआय क्षेत्रातील अफाट संधी स्पष्ट होत आहेत. एआय ही केवळ एक सुविधा नसून भविष्यातील अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार आहे. अशा परिस्थितीत भारताला या शर्यतीत टिकून राहण्यासाठी स्टार्टअप्स आणि संशोधनाला मोठी चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा – UPI Cash Withdrawal: कार्ड विसरलात तरी टेन्शन नको! QR कोड स्कॅन करा आणि ATM मधून पैसे काढा; कसे ते जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number