Crude Oil Price : कच्च्या तेलाचा भडका! इराण-इस्रायल युद्धाच्या सावटाखाली जागतिक शेअर बाजार गारद; मात्र, भारतीय बाजाराला आज दिलासा

अमेरिका-इराण युद्धविरामाबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. मात्र, जागतिक स्थिती पाहता कच्च्या तेलाच्या दरवाढीचे संकेत मिळत आहेत.

Crude Oil Price : कच्च्या तेलाचा भडका! इराण-इस्रायल युद्धाच्या सावटाखाली जागतिक शेअर बाजार गारद; मात्र, भारतीय बाजाराला आज दिलासा

Crude Oil Price : इराण आणि इस्रायल यांच्यात पेटलेल्या भीषण लष्करी संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला असून भारतीय भांडवली बाजारासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये प्रचंड घसरण होत आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रातील (Tech Sector) शेअर्सच्या झालेल्या तुफान विक्रीमुळे गुंतवणूकदारांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाच्या थेट परिणामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अवघ्या एका दिवसात तब्बल 4 डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या या अचानक झालेल्या दरांच्या भडक्याने जगभरातील गुंतवणूकदारांची धाकधूक चांगलीच वाढवली असून महागाईचा धोका अधिक गडद केला आहे.

आज भारतीय बाजाराला दिलासा
अमेरिका-इराण संघर्षातील युद्धविरामाबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. AIमुळे वाढलेले IT शेअर्स तसेच ऑटो शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. सकाळी बाजार उघडल्यानंतर BSE सेन्सेक्स तब्बल 510 अंकांनी वाढून 74035 वर तर NSE निफ्टी 50 निर्देशांक 109 अंकांनी वाढून 23,231 वर व्यवहार करत होते. मोठ्या बाजारासोबतच आज सकाळी विस्तृत बाजारही वाढला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.83 टक्क्यांनी तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.63 टक्क्यांनी वाढून व्यवहार करताना दिसले. आज शेअर बाजारातील सर्व सेक्टर हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसत आहेत. तसेच, रुपयाही 25 पैशांनी वाढून 95.46 प्रति डॉलरवर व्यवहार करत आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा धोक्यात; आशियाई बाजारात मोठी पडझड
या भीषण घसरणीला प्रामुख्याने जागतिक तेल पुरवठ्याबाबत निर्माण झालेली असुरक्षितता कारणीभूत ठरली आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील तेलवाहतूक मार्ग मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझ सामुद्रधुनीतून' (Strait of Hormuz) तेलाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आशियाई बाजारांना आज सर्वात मोठा फटका बसला असून, दक्षिण कोरियाच्या बाजारात घसरण झाल्याने तिथली दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे समभाग (Shares) 10 टक्क्यांहून अधिक घसरले. आशियातील प्रमुख बाजारपेठांमधील घसरणीची आकडेवारी खालीलप्रमाणे राहिली होती:

कोस्पी (द. कोरिया) : 9.03 टक्के
जकार्ता कॉम्पोझिट : 4.73 टक्के
निक्केई 225 : 4.40 टक्के
निक्केई (जपान) : 3.9 टक्के
तैएक्स (तैवान) : 3.5 टक्के
स्ट्रेट्स टाइम्स : 1.74 टक्के
शांघाय निर्देशांक : 1.7 टक्के
हँग सेंग : 1.38 टक्के
एसईटी कॉम्पोझिट : 1.34 टक्के

हेही वाचा – Dividend: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा सरकारला मोठा आर्थिक हातभार; अर्थमंत्र्यांकडे सोपवला 8813 कोटी रुपयांचा चेक

युरोप आणि अमेरिकेतही घबराट; आगामी काळात अस्थिरता वाढणार
आशियाई बाजार कोसळल्यानंतर दुपारच्या सत्रात सुरू झालेल्या युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारांमध्येही प्रचंड घसरण नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यास अनेक देशांमध्ये इंधनाचे संकट उभे राहील, या भीतीने जागतिक बाजारपेठा ग्रासल्या आहेत. आर्थिक विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष शांत होत नाही किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून कूटनीतिक तोडगा निघत नाही, तोपर्यंत कच्च्या तेलातील वाढ आणि शेअर बाजारातील ही अभूतपूर्व अस्थिरता अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. या तणावामुळे येत्या काही दिवसांत सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

FII ने भारतीय बाजारातून काढून घेतले 43 हजार कोटी रुपये
जागतिक बाजारातील या पडझडीचे थेट आणि अत्यंत तीव्र पडसाद काल भारतीय शेअर बाजारातही उमटत आहेत. पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव आणि वाढत्या अनिश्चिततेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. चालू जूनच्या पहिल्या आठवड्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे 43,000 कोटी रुपये काढून घेतले असून, या प्रचंड निधीच्या माघारीचा थेट फटका आज देशांतर्गत भांडवली बाजाराला बसला.  व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजारचा मुख्य निर्देशांक 'BSE सेन्सेक्स' 719 अंकांनी घसरून 73,524 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारचा 'NSE निफ्टी' देखील 244 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 23,123 वर स्थिरावला होता.

हेही वाचा – Attack on Ship in Hourmuz: होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव शिगेला! जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, नौदलाकडे मागितली मदत, धक्कादायक व्हिडीओ समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number