‘आम्ही कायम सोबत राहण्याची शपथ घेतली होती’, पत्नीला संपवून पतीची आत्महत्या; ‘हे’ कारण आलं समोर

दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमध्ये पत्नीला संपवून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने प्रथम पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून स्वतःलाही संपवले.

‘आम्ही कायम सोबत राहण्याची शपथ घेतली होती’, पत्नीला संपवून पतीची आत्महत्या; ‘हे’ कारण आलं समोर

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुलदीप त्यागी (वय 46) नावाच्या मध्यमवयीन पुरुषाने प्रथम आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने पत्नी अंशू त्यागी (वय 43) हिच्यावर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. 

घरातील इतर लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच, ते लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली. यामध्ये त्याने आणि स्वतःला आणि त्याच्या पत्नीला संपवण्यामागील कारण लिहिले होते. पती कर्करोगाने ग्रस्त होता. कुटुंबातील कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. त्याला त्याच्या उपचारासाठी जास्त खर्च येऊ नये असे वाटत होते, म्हणून त्याने हे पाऊल उचलले, असे यात लिहिले होते.

हेही वाचा – आई नव्हे, वैरीण! प्रियकराच्या मदतीने मुलीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल

प्रथम पतीने पत्नीवर गोळी झाडली आणि नंतर आत्महत्या केली
कुलदीप त्यागी नावाच्या व्यक्तीचे कुटुंब नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरात राहत आहे. त्याच्या कुटुंबात त्यांचे वडील, दोन मुले आणि पत्नी आहेत. बुधवारी सकाळी कुलदीप त्यागी आणि त्यांची पत्नी त्यांच्या खोलीत होते. त्यांचा मोठा मुलगा त्याच्या ड्युटीसाठी बाहेर गेला होता. तर, मृताचे वडील आणि दुसरा मुलगा दुसऱ्या खोलीत होते. अचानक कुलदीप त्यागीने त्याच्या पत्नीवर गोळी झाडली, ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली. गोळीचा आवाज ऐकताच त्याचा मुलगा घटनास्थळी धावला. दरम्यान, कुलदीपने स्वतःवरही गोळी झाडली. 'मला कर्करोग आहे, उपचारांवर जास्त खर्च करायचा नाही,' असे लिहून ठेवत पती कुलदीप यांनी पत्नीवर गोळी झाडून नंतर स्वतः आत्महत्या केली. 

कुलदीप यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचा मुलगा त्याच्या आईला मरियम रुग्णालयात घेऊन गेला. परंतु, डॉक्टरांनी तिलाही मृत घोषित केले. ही माहिती स्थानिक पोलिसांना तत्काळ देण्यात आली. माहितीच्या आधारे, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये कुलदीप त्यागी यांनी लिहिले होते की, ते कर्करोगाने ग्रस्त आहेत. याची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती नव्हती. मला उपचारांवर पैसे खर्च करायचे नाहीत, म्हणूनच मी हे करत आहे.

हेही वाचा – पुण्यात रिक्षाचालकांची गुंडगिरी! नागरिकांना रोजचा फुकटचा त्रास; पोलीस अद्याप गप्पच

कुलदीप यांनी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एसीपी नंदग्राम पूनम मिश्रा म्हणाल्या की, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यांनी सांगितले की, पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये कुलदीप यांनी ही घटना घडवून आणण्याचे कारण लिहिले होते. त्यात असे नमूद केले आहे की, ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांना त्यांच्या मुलांनी या आजारात जास्त पैसे खर्च करावेत असे वाटत नव्हते. म्हणून त्यांनी नाईलाजातून हे पाऊल उचलले. एसीपी म्हणाले की, सर्व पैलूंवर पोलिस सध्या अनेक दृष्टिकोनातून सखोल तपास करत आहेत आणि जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल.

“हा माझा स्वत:चा निर्णय आहे. कुणीही, विशेषत: माझी मुलं, माझ्या या निर्णयासाठी जबाबदार नाहीत”, असंही या नोटमध्ये कुलदीप त्यागी यांनी लिहून ठेवलं आहे.

पोलिसांचा तपास काय सांगतो?
दरम्यान, ही सुसाईड नोट कुलदीप त्यागींनीच लिहिली आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. शिवाय, त्यांना कर्करोग होता की नाही? याबाबतही खात्री करून घेण्यासाठी तपास चालू असल्याचं पूनम मिश्रा यांनी सांगितलं. यासंदर्भात कुलदीप त्यागी यांच्या उपचारांशी निगडित काही कागदपत्र त्यांच्या खोलीत सापडल्याचं त्या म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number